Saturday, November 23, 2024

डोंबिवली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकधून अटक

Share

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी (Dombivli MIDC Blast) नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील पहिली अटक झाली आहे मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिक मधील मेहेर धाम परिसरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. बॉयलर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील रिअॅक्टर स्फोटात मृतांचा आकडा 11 वर पोहोचल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, या घटनास्थळी दोन ते तीन कंपन्यांनाही आग लागली. स्पोटातील मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्रीपासून नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि ठाणे गुन्हे शाखा पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत मुख्य आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती प्रदीप मेहता नाशिकमध्ये आली होती. नाशिकमध्ये दाखल नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता. पोलिसांच्या टीमने त्यांना अटक केली असून त्यांना नाशिकमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर प्रक्रिया पार पाडून त्यांना मुंबईच्या दिशेने नेण्यात येणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख