Friday, September 20, 2024

विशाळगडाच्या मुक्तीसाठी पायथ्याशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली महाआरती

Share

जिहादी लँड माफियांच्या ताब्यातून विशाळगड मुक्त करावा या मागणी साठी काल हजारो उत्साही हिंदू तरुण ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी जमले होते. जय भवानी जय शिवाजी तसेच आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे म्हणाले की विशाळगडावर १५० च्या वर अनधिकृत अतिक्रमणे आहेत. यामध्ये एक तीन मजली मशीद आहे, त्याबरोबरच मलिक रेहान दर्ग्याचे अतिक्रमण सुद्धा आहे. रायगडावरचा किंवा राजगडावरचा एक दगड जरी हलवायचा म्हटलं तरी शिवभक्तांना शेकडो परवानग्या घ्याव्या लागतात, मग भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत किल्ला असताना ही अतिक्रमणे झालीच कशी ? विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण करून बांधलेल्या इस्लामिक वास्तू त्वरित हटवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

मराठा साम्राज्यातील महत्त्वाचा किल्ला आणि समृद्ध इतिहास म्हणून ओळखला जाणारा विशाळगड किल्ल्यावरून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अतिक्रमणांकडे डोळेझाक करून वारसास्थळाचे संरक्षण करण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

“किल्ल्याला त्याचे मूळ वैभव प्राप्त होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असे एका आंदोलक नेत्याने सांगितले. “हे आंदोलन फक्त जमिनीच्या एका तुकड्याबद्दल नाही तर ते आपल्या इतिहासाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या ओळखीबद्दल आहे.”
विशाळगड अतिक्रमणावरून न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. स्थानिक प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी उपस्थित हजारो शिवभक्तांना शिवनिष्ठ बांदल घराण्यातील श्री अनिकेत बांदल, हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री नितीन शिंदे यांनीही संबोधित केले.

अन्य लेख

संबंधित लेख