Friday, May 9, 2025

पूजा खेडकर प्रकरणात पंकजा मुडेंचं स्पष्टीकरण

Share

महाराष्ट्रासह देशात गाजतं असलेलं वादग्रस्त IAS पूजा खेडकर प्रकरणात आता भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे यांचं नाव आलं आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे खेडकर कुटूंबाशी संबंध असल्याच बोलल जात आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी देणगी दिल्याची चर्चा आहे. तर पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळावी, म्हणून पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डीतील मोहटादेवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केल्याचंही बोललं जात आहे. यावर आत स्वतः पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.

“माझ्यावरच्या आरोपांमुळे मी अत्यंत व्यथित झाली आहे. मी दोन दिवसांपासून माझ्या लोकांच्या आनंदात होते. हा आनंद पाहवला न गेल्याने हे प्रकरण माझ्याशी जोडण्यात आलं. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकरिता मी त्यांचा एक रुपयाही घेतलेला नाही. मी एवढीही मोठी नाही की, एखाद्या व्यक्तीला बोगस पद्धतीने आयएएस अधिकारी बनवू शकते. त्यामुळे राजकारणी आणि समाजकारणी म्हणून मी यावर कायद्याने पाऊल उचलणार असून इथून पुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. पाच वर्ष माझ्याविरोधात अशी कुठलीच बातमी मला दिसली नाही. आता मला विधानपरिषद मिळल्याने असे प्रकार सुरु असू शकतात.” असं त्या म्हणाल्या.
 
“मी अशा गोष्टी का करु? हे प्रकरण माझ्याशी जोडण्याचं कारस्थान आहे, असं मला वाटतं. कायद्याने खेडकरांचा तपास होईल. ते चुकले असतील तर शिक्षा होईल आणि नसतील चुकले तर खरंखोटं होईल. राज्यात कितीतरी असे अधिकारी नेते आहेत जे खाजगी गाड्यांवर दिवे लावतात, त्यांचाही तपास व्हायला हवा. हा लोकल विषय आहे की, राजकीय द्वेषाचा विषय आहे, यावर विचार करायची गरज आहे,” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

अन्य लेख

संबंधित लेख