लातूर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रमुख नेत्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि वंचित बहुजन आघाडीचे (VBA) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची नुकतीच भेट झाली, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आणि अटकळांना उधाण आले. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात विविध अर्थ काढले जात आहेत. आंबेडकर यांच्या राज्यात सुरू असलेल्या ‘आरक्षण बचाव’ मोर्चादरम्यान ही भेट झाली.
प्रकाश आंबेडकर हे आज लातूरवरुन (Latur) बीडकडे निघाले होते. याचवेळी पंकजा मुंडे या बीडवरुन लातूरकडे निघाल्या होत्या. त्यावेळी बीड (Beed) आणि लातूरच्या मध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. ही भेट नियोजित नव्हती, अचानक भेट झाली. मात्र राजकीय वर्तुळात या भेटीमध्ये वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत
गेल्या काही दिवसापासून राज्यभरात मराठा आणि ओबीसी आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळायला हवं यासाठी मनोज जरंगे हे उपोषण केलं आहे. तर, दुसरीकडे लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण वाचावं यासाठी उपोषण केलं होतं. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केलंय.
- कणकवली-कुडाळमध्ये राणे बंधूंचा दबदबा; विरोधकांचा दारुण पराभव
- एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !; देवेंद्र फडणवीस यांची महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर पहिली प्रतिक्रिया
- परळीत धनंजय मुंडे यांचा विजय, राजेसाहेब देशमुखांचा पराभव
- भाजप उमेदवाराच्या बहिणीवर धामणगावात हल्ला
- नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई, ७ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी