सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 8 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला उभारण्यात आला होता. हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनी झालेल्या सर्व घटनेबद्दल सरकारला दोष देणे सुरु केला आहे. विरोधकांकडून छत्रपतींच्या पुतळा प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय. आता, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी याबाबत बोलताना थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेनंतर, नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की, “शरद पवार साहेबांनी किती मंदिरे बांधली आहेत हे मला सांगा.” हे विधान राणे यांनी केले आहे, ज्यात त्यांनी शरद पवार यांच्या सार्वजनिक कार्यांवर प्रश्न उपस्थित केला आहे.
तसेच, राहुल गांधी यांच्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, “राहुल गांधी यांचा धर्मच कळत नाही.” नारायण राणेंनी नाव न घेता आमदार वैभव नाईक यांनाही टोला लगावला आहे ते बोलताना म्हणाले ” काल एक आमदार बांधकाम विभागाचं ऑफीस फोडण्यासाठी गेला. तो ऑफिस फोडण्यासाठी गेला ते ऑफीस बंद झाल्यावर आणि मिरवतो की मी निष्ठावान आमदार आहे. हा निष्ठावान आमदार सकाळी मातोश्री आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्याकडे असतो, तसेच, आमदार झाल्यापासून कळलं नाही का, की तिथं जाऊन पुतळा पहावा,”
नारायण राणे आज सिंधुदुर्ग येथील घटना स्थळी जाणार आहे आणि ते पत्रकार परिषद घेणार आहेत आता पत्रकार परिषेदमध्ये नारायण राणे काय बोलतील या वर सर्वांचे लक्ष असेल