Wednesday, January 15, 2025

रविवारी रत्नागिरीत होणार वकिलांची कार्यशाळा

Share

येत्या रविवारी म्हणजे दिनांक 1 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत ‘मराठा भवन हॉल’ येथे वकिलांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न होणार आहे. 1 जुलै 2024 पासून देशात तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले, याच अनुषंगाने ‘नवीन फौजदारी कायदे – गरज आणि व्यावहारिक पैलू’ या आधारावर ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी, जिल्हा पोलिस दल, रत्नागिरी, किर लॉ कॉलेज, रत्नागिरी आणि अधिवक्ता परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा संपन्न होणार आहे.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड.श्री.राजन साळुंखे, ठाणे, अॅड.श्री.आशिष चव्हाण, मुंबई व माझी जिल्हा न्यायाधीश श्री.राजन गुंजीकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळे मुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वकिलांना तीन नवीन कायद्यांबद्दल खूप चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन मिळेल असा आयोजकांना विश्वास आहे, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त वकिलांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.    

अन्य लेख

संबंधित लेख