राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिका दौऱ्यात तिथल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी अनेक प्रश्न आणि मुद्यांवर त्यांनी त्यांची मतं मांडली. त्यावरुन देशात एकच वादंग उठले. राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या संपवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. आता गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आपला मोर्चा पण पण राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्याकडे वळवला आहे. त्यांनी राहुल गांधी यांची एटीएसकडून (ATS)चौकशीची मागणी केली आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, भारताच्या अविभाज्य भाग असलेल्या अखंड काश्मिर प्रश्नावर इल्हाना उमरला राहुल गांधी भेटतो. ती जैश ए मोहम्मद, लष्करे तोयबा अशा अतिरेकी संघटनांशी संबंधित आहे. ती पाकव्याप्त काश्मीर म्हणते. अतिरेकी संघटनांशी संबंध असलेल्या महिलेला राहुल गांधी परदेशात जाऊन भेटतो. त्या महिलेशी यांचे काय संबंध आहेत. तिच्याशी चर्चा करतो, देशाच्या हिताच्या विरोधात काय भाष्य करतो?
त्यांनी केलेलं वक्तव्य हे देशद्रोही वक्तव्य आहे. समानतेच्या तत्त्वावर राहुल गांधी बोलले नाही… राहुल गांधी अपरिपक्व आहे. त्यांचं हे बोलणं असंविधानिक आहे. ATS सारख्या संस्थेने राहुल गांधी यांच्या बाबतीत चौकशी करावी आणि त्यांना अटक करावे. आम्ही त्यांच्या विरोधात आज तक्रार दाखल केली आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केले.