मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अमेरिका दौरा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. त्यावरुन देशात एकच वादंग उठले. राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या संपवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्या दरम्यान काय केले ? या दौऱ्यात ते कोणाला भेटले ? याचा खुलासा भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत केलाय.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्या दरम्यान काय केले ?
केशव उपाध्ये म्हणाले की, “एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाऊन भारताची प्रतिमा अधिकाधिक मोठी करत असताना राहुल गांधी प्रदेशात जाऊन देशातले आरक्षण रद्द करण्याबद्दल बोलून घेतात आणि त्याच आरक्षणावरून देशात राजकारण करतात,” असे ते म्हणाले.
या दौऱ्यात ते कोणाला भेटले ?
“तसेच राहुल गांधी यांनी अमेरिकेत कट्टर इस्लामिक नेत्या इल्हान उमर यांची भेट घेतली. इल्हान उमर यांनी कायमच भारतविरोधी भूमिका घेतली असून काश्मीर भारतापासून वेगळे करण्याबाबत त्या बोलत आहेत. जम्मू-काश्मीरच्या निवडणुका तोंडावर असताना राहुल गांधी त्यांना का भेटले असतील? याचे उत्तर शोधण्याची गरज नाही,” असेही ते म्हणाले.