Sunday, October 20, 2024

स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते झाले ‘निर्मल वारी अभियान’ पुस्तिकेचे विमोचन

Share

सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे झालेल्या धर्माचार्य चिंतन संमेलनात स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी निर्मल वारी अभियान या पुस्तिकेचे विमोचन केले. 17 सप्टेंबर रोजी ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या दोन पुस्तिकांचे स्वामीजींनी पुण्यात विमोचन केले होते. अशा प्रकारच्या पुस्तकांची समाजाला फार जास्त आवश्यकता आहे असे मत स्वामीजींनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पाप प्रवाह रोखला होता तो आता उफाळी घेऊन येताना आपल्याला दिसत आहे, त्यामुळे ज्ञानोबा तुकोबांनी समाज परिवर्तनाचे जे कार्य हाती घेतले होते त्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे आणि ते आपल्या सर्वांना करावे लागेल असे आवाहन स्वामीजींनी याप्रसंगी केले.

या संमेलनासाठी श्री ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज, श्री ह.भ.प. मारुती महाराज तूनतूने, श्री ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, श्री ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज, श्री ष.ब्र.श्रीकंठ शिवाचार्य महाराज, श्री ष.ब्र.नीलकंठ शिवाचार्य महाराज, श्री ष.ब्र रोचोटीश्वर शिवाचार्य महाराज, श्री ष.ब्र .शिवलिंगेश्वर शिवाचार्य महाराज, श्री ह.भ.प.भागवत चवरे महाराज, श्री ह.भ.प.अभिमन्यू महाराज डोंगरे, श्री ग्रंथी रमेश सिंग बतवाणी, श्री ओम दरक यांची विशेष उपस्थिती होती. अनेक साधु-संत या संमेलनासाठी सोलापूर येथे उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख