Friday, October 18, 2024

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन?

Share

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन? अशी विरोधकांची स्थिती झाली आहे.
हरियाणा(Haryana) आणि जम्मू आणि काश्मिरच्या(Jammu and Kashmir) निवडणूकीने हे फेक नरेटिव्ह ब्रेक केला असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केले.

https://twitter.com/i/broadcasts/1lDGLlmwnooGm

विरोधक भाजपावर आगपाखड करण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी तयार होते मात्र या निकालाने त्यांची पंचाईत केल्याचेही ते म्हणाले. लोकसभा निवडणूकीत जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो आता संपलेला आहे. जनता भाजपाच्या पाठिशी उभी आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

देवेंद्र फडणवीस जेव्हा वित्त मंत्री होते त्यावेळी ८ नवीन मेडीकल कॉलेजची घोषणा करण्यात आली होती. त्यातील ५ वैद्यकीय महाविद्यालय विदर्भातील आहेत. गडचिरोली, भंडारा, वाशिम, बुलडाणा अशा कॉलेजची सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना टेंडर दिलेले नागपूर विमानतळ संदर्भात उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत चा प्रवास झाला आणि सर्व स्तरावर मान्यता मिळून आता विमानतळ उभे राहते आहे. त्यामुळे एक आनंदाचा आजचा दिवस आहे. या सर्व पायाभूत सुविधा सामान्यांसाठी उपलब्ध होत आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख