Friday, October 18, 2024

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांच्या अडचणीत वाढ… चौकशीसाठी समन्स

Share

नागपूर जिल्हा बँक (Nagpur Jilha Bank)घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार (Sunil Kedar) यांना चौकशी समितीकडून समन्स बजावण्यात आला आहे. चौकशी अधिकारी न्या. जे. एन. पटेल यांनी सुनील केदार यांच्यासह संबधित पक्षकारांना समन्स बजावले आहेत. सदर चौकशी नागपूरच्या रवी भवन येथील सभागृहात होणार असून येत्या 14, 15, 16 आणि 17 ऑक्टोबरला स्वतः किंवा वकिलामार्फत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आहे.

या आदेशानुसार, पक्षकार अनुपस्थित राहिल्यास चौकशीची कारवाई त्यांच्याशिवाय पूर्ण केली जाईल. तसेच ही चौकशी कोणत्याही परिस्थितीत तहकूब केली जाणार नसल्याचे या सांगितले आहे.

काय आहे प्रकरण? 1999 साली सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष होते. त्यावेळी बँकेत असलेली रक्कम एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने कोलकातामधल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. मात्र सहकार विभागाचा कायद्यानुसार बँकेची परवागी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही. या नियमाचे उल्लंघन करत रक्कम गुंतवली गेली होती. खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे शेतकऱ्याचे बँकेत ठेवलेले पैसेही बुडाले होते. न्यायालयाने दोषी सिद्ध ठरवत पाच वर्षांची शिक्षा 150 कोटी रुपयांच्या जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना आधीच नागपुरातील न्यायालयाने दोषी सिद्ध ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या सुनील केदार त्याच प्रकरणी जामिनावर बाहेर आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख