Friday, October 18, 2024

स्कॅम से बचो अभियान …ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका आता नियंत्रणात

Share

स्कॅम से बचो अभियान हे ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढता धोका नियंत्रणात राखण्यासाठी मदत करेल
डिजिटल सुरक्षा आणि सतर्कता याबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचं प्रतिबिंब यामध्ये आहे हा उपक्रम अगदी योग्य वेळी सुरू झाला असून ऑनलाइन घोटाळ्याचा वाढता धोका पाहता नागरिकांच्या हितासाठी केलेली ही आवश्यक उपाययोजना आहे असं जाजू यावेळी म्हणाले. डिजिटल इंडिया अभियानामुळे देशातली इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 90 अब्जांवर गेली आहे. त्याचवेळी सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढते आहे असं हिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितलं.

https://x.com/MIB_India/status/1847231291986731050


ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि मेटा कंपनीनं स्कॅम से बचो हे अभियान सुरू केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी मिळून या अभियानाचा आराखडा निश्चित केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत या अभियानाचा काल नवी दिल्लीत प्रारंभ करण्यात आला.

 

अन्य लेख

संबंधित लेख