Saturday, November 23, 2024

‘राष्ट्र कार्य हेच धर्म कार्य’- डॉ. आशुतोष काळे

Share

पुणे – महिला फक्त ‘चूल आणि मूल’ एवढ्या पुरतेच मर्यादित नाहीत. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज २१ शतकातील नारी उभी आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी आजच्या सक्षम नारीची पायाभरणी केली आहे. तुम्ही अबला नाही, सबला नारी आहात, तुम्ही आपली ताकद ओळखा असा संदेश डॉ. आशुतोष काळे यांनी दिला.

बिबवेवाडी येथील आय स्कूलमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

डॉ काळे पुढे म्हणाले, माहेश्वरी साडीची निर्मिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केली असून अहिल्यादेवी होळकरांचे जीवन चरित्र पूर्णपणे एका तपस्विनीसारखे होते. एक शक्तिशाली शासक असूनही, त्यांची प्रतिमा विनम्र होती. हातात महादेवाची पिंड आणि बेल पत्र घेऊन त्यांनी शासन चालवले. हिंदू धर्म जोपासण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांच्याच शासन काळात इस्लामिक आक्रमकांनी ध्वस्त केलेले कशी विश्वेशवराचे मंदिर पुन्हा बांधले. त्या सोबत उत्तरेतील अनेक मंदिरांची बांधणी त्यांनी केली. समाज व राष्ट्र बलशाली होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्या उत्तम दूरदृष्टी असलेल्या शासक होत्या, उत्तम प्रशासकीय कौशल्य त्यांच्या कडे होते. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाबाई महाराज यांच्या स्वप्नातील हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. राष्ट्र कार्य हेच धर्म कार्य आहे व त्या धर्म कार्या करता सर्व समाजाने एकत्र येऊन काम केले पाहिजे असा विश्वास डॉ काळे यांनी व्यक्त केला.

संचालिका शीतल लडकत, मंजिरी आळशी यावेळी उपस्थित होत्या.

अन्य लेख

संबंधित लेख