Thursday, October 24, 2024

धुळे जिल्ह्यात पाच उमेदवारांनी दाखल केले नऊ नामनिर्देशन पत्र

Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अधिसूचना प्रसिध्द झाली असून त्यानुसार धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाच उमेदवारांनी नऊ नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघाची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी
05-साक्री विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावीत यांनी
एक तर अपक्ष म्हणून एक असे दोन अर्ज, 06-धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार हिलाल माळी यांनी एक,
07-धुळे शहर विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी दोन,
08-शिंदखेडा विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयकुमार रावल यांनी दोन,
09-शिरपुर विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काशिराम पावरा यांनी दोन अर्ज असे एकूण पाच उमेदवारांनी नऊ अर्ज दाखल केले आहे. अशी माहिती जिल्हा निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख