शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग
महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) नवा फॉर्म्युला समोर येत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्ह आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर आता ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि कॉग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या कधी येतात? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपा नेते आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम मतदार संघातून, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवडीतून आणि नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघातून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अंकुश कदम यांनी उमेदवारी दाखल केली.
अहिल्यानगरमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपाचे राम शिंदे, कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे आणि श्रीरामपूरमधून संतोष कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बंडखोर उमेदवार अर्चना घारे-परब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.