Sunday, October 27, 2024

काही राजकीय मंडळी भारतीय उद्योजकांच्या विरोधात खोटे विमर्श का पसरवत आहेत 

Share

राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाकी इंडी आघाडीचे पक्ष यांची मानसिकता स्पष्टपणे दिसून येत आहे की ही राजकीय मंडळी आणि यांचे पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी काही भारतीय उद्योजकांना खालच्या स्तरावर जाऊन टीका का करतात. पण आपण यांना कधी चीन व चीनचे उद्योजक ज्यांनी आपला मोठा रोजगार पळवला, पैसा खेचून नेला, अर्थव्यवस्थेला कमजोर केल, तोच पैसा वापरून आपल्या सैन्यावर हल्ला केला अशा कोणाही बद्दल एक शब्द बोलताना आपण ऐकले आहे का? अमेरिकन आणि युरोपातील उद्योजक ज्यांनी आपलं शोषण केल याबद्दल ही नेते मंडळी कधी बोलताना ऐकलं आहे का? यांना या सर्व विदेशी उद्योजकांना १४० कोटी लोकांचं मार्केट असलेला देश ताब्यात द्यायचा आहे असे दिसून येत नाही का? आणि हे सर्व सुरु आहे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या फायद्यासाठी. म्हणूनच जेंव्हा नरेंद्र मोदींनी “आत्मनिर्भर भारत” योजना आणली त्यावेळी ही सर्व मंडळी नाखुश होती. भाजपा सरकारच उद्दिष्ट देशात जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणे हे आहे. जगातील मोठ मोठे उद्योजक ज्यांना भारतीय बाजार पूर्णपणे काबीज करायची आहे नेहमी षडयंत्र रचत असतात व त्यांना इथल्या विरोधकांची साथही मिळतेय, हे सर्व माहित असून सुद्धा मोदींनी “राष्ट्र प्रथम ” या भावनेने या सर्वांच्या विरुद्ध जाऊन भारतात जास्त रोजगार निर्माण व्हावे, भारतीय उद्योजक वाढावे, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी मागच्या दहा वर्षात ४० पॉलिसीज आणल्या आणि त्याचा सकारात्मक फायदा आपल्याला हळू हळू सर्व क्षेत्रात दिसू लागला आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की लाकडी फर्निचर जो भारतीय व्यवसाय आहे, खेळणी आणि अशा बऱ्याचश्या वस्तू ज्या भारतात बनू शकतात त्या काँग्रेसने जास्तीत जास्त चिनमधून आयात करून आपल्या उद्योजकांना कमजोर करणे व बेरोजगारी वाढवणे हेच काँग्रेस काळात आपल्याला बघायला मिळत होत. मोदींच्या “आत्मनिर्भर भारत” योजनेअंतर्गत जास्तीत जास्त वस्तू भारतात बनवायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे काही ज्या वस्तूंची, मशीन्सची आणि उपकरणांची आपण आयात करत होतो, आता आपण त्यांची निर्यातही करायला लागलो आहेत, आणि हे पुढच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, हेच खूपतंय का विरोधकांच्या डोळ्यात?

अदानी आणि अंबानी विरोधकांच्या टार्गेट वर का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध गुजरात राज्याशी आहे तसाच संबंध या दोन उद्योजकांचा गुजरातशी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींची सामान्य जनतेतली स्वच्छ प्रतिमा मलीन करण्यासाठी ते या दोन उद्योजकांच्या भरभराटीसाठी काम करत आहेत हे दाखवण्यासाठी रोज खोटे विमर्श समाजात पसरवत आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी उद्योजकांवर हल्ला करणे आणि टीका करणे ही फॅशन बनली आहे.  बऱ्याच प्रकरणांमध्ये, व्यवसायांचा थेट संबंध नसला तरीही त्यांच्यावर टीका केली जाते.  सध्याच्या काळात सातत्याने राजकीय हल्ल्यांचा सर्वाधिक फटका उद्योगपतींना सहन करावा लागत आहे ते म्हणजे अंबानी आणि अदानी.

 कंपन्या आणि व्यावसायिक, उद्योजक यांच्यावर टीका आणि हल्ले नवीन नाहीत.  २० व्या शतकात, विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय व्यवसायांवर टाटा आणि बिर्ला यांचे वर्चस्व होते.  राजकारणी आणि नोकरशहा यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध बघून त्यांच्यावर अनेकदा क्रोनी भांडवलशाहीचा आरोप करण्यात आला.

गेल्या काही वर्षांमध्ये, अदानींना विशेषत: स्वार्थी राजकीय शक्तींकडून खूप टीकेला सामोरे जावे लागले आहे.  पण राजकीय दडपशाही त्यांनी आपल्यावर कधीही हावी होऊ दिली नाही. भारतीयांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या त्यांच्या व्हिजनवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.  त्यांच्या व्यवसायांनी गेल्या दशकात भारतीयांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण केल्या आहेत आणि येत्या काही वर्षांत ही संख्या कमी होईल असे वाटण्याचे कारण नाही.  किंबहुना, ते भारतात त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करत आहेत हे लक्षात घेता, निर्माण झालेल्या नोकऱ्यांची संख्या आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला यांनी भारतात राहून भारतीय उत्पादने बनवली, भारतीय लोकांसाठी कंपन्या बनवल्या, सर्वसामान्यांसाठी प्रचंड शेअरहोल्डर संपत्ती निर्माण केली, डिजिटल स्पेसमध्ये क्रांती केली, अक्षय ऊर्जा क्षेत्र, ओ अँड जी , अन्न पुरवठा साखळी, कपडे, दूरसंचार, संरक्षण, शिपिंग, मेटल, ऑटोमोबाईल इत्यादी क्षेत्रात रोजगार निर्मिती केली, भारताची आर्थिक स्थिती मजबूत केली आणि जागतिक स्तरावर भारताचे नावं मोठे केले.

इतर देशांमध्ये मोठ्या उद्योगांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून पाहिले जाते आणि त्यानुसार समर्थन दिले जाते, तर भारतात, ऐतिहासिक आर्थिक धोरणांचा वारसा, राजकीय घोटाळे आणि विरोधी विमार्षांमुळे मोठा व्यवसाय किंवा उद्योजक आणि सार्वजनिक लोकांमधील धारणा यांच्यात एक विभक्त संबंध निर्माण झाला आहे. तरीही भारतीय व्यवसायांनी देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये, तांत्रिक प्रगतीमध्ये आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  व्याख्येनुसार, व्यवसाय नफा मिळविण्यासाठी सुरु केला जातो.  साहजिकच, यशस्वी व्यवसायाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची संपत्ती वाढेल.  तो पैसा देशाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि प्रक्रियेत अधिक संपत्ती निर्माण करण्यासाठी वापरला गेला तर ती समाजाची आणि राष्ट्राची मोठी सेवा आहे. प्रतिस्पर्ध्याच्या संपत्तीत वाढ झाल्याने मत्सर निर्माण होऊ शकतो.  एक देश म्हणून, आपण अशा संपत्ती निर्मितीचा उत्सव साजरा केला पाहिजे, जोपर्यंत त्याचा उपयोग आर्थिक क्रियाकलाप चालविण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी केला जातोय.

स्कोच ग्रुपने स्थापन केलेले ‘इंडिया इन्व्हॉल्व्ह इंटरव्हेंशन्स’ देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात कॉर्पोरेट्सनी केलेल्या कामाची मान्यता देते. त्यांनी एक निर्देशांक विकसित केला आहे जो २०४७ पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेसाठी भारतीय कंपन्यांच्या वचनबद्धतेचे मोजमाप करतो.  आमच्या २०२३ च्या क्रमवारीत, ज्याने २३१ निर्देशकांवर कंपन्यांचे मूल्यांकन केले, रिलायन्स इंडस्ट्रीज या यादीत अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर हिंदुस्थान युनिलिव्हर, अदानी समूह, बँक ऑफ इंडिया आणि लुपिन यांचा क्रमांक लागतो.

२०२३ मध्ये केलेल्या सहा महिन्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की ४०% कॉर्पोरेट्स डिजिटल परिवर्तनावर केंद्रित आहेत, त्यानंतर पर्यावरणीय उत्कृष्टता (२४%), कॉर्पोरेट उत्कृष्टता (१९%), सामाजिक उत्कृष्टता (१४%), आणि गव्हर्नन्स उत्कृष्टता (२%) .

रोजगार निर्मिती हे निःसंशयपणे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.  देशातील १४० कोटी लोकांपैकी केवळ १. ४ कोटी लोक सरकारी नोकरीत आहेत. मोठा वर्ग खाजगी कंपनीत नोकरीसाठी प्रयत्नशील असतो, हे माहित असूनसुद्धा भारतीय उद्योजकांना टार्गेट करणं कितपत योग्य? करोडो लोकांना रोजगार, स्वयंरोजगार, राहणीमान उंचावण व देशाला प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणाऱ्या उद्योजकांना टार्गेट करणं म्हणजेच देशहिताशी खेळणं नाही का?

अंबानी आणि अदानी समूहाची काही सामाजिक कार्ये 
रिलायन्स फाउंडेशनचा ग्रामीण परिवर्तन कार्यक्रम, १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असून, उपेक्षित समुदायांना सक्षम बनवतो.  आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २. ७ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचून, या कार्याद्वारे महिला उद्योजकता आणि शाश्वत शेतीवर भर असे अनेक विषय ज्यामुळे उपजीविकेची नवीन परिसंस्था निर्माण होते.

१९९६ मध्ये स्थापन झालेल्या अदानी फाऊंडेशनने १९ राज्यांमधील ५७५३ गावांमधील ७. ३ दशलक्ष लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकून एकात्मिक विकासासाठी वचनबद्धता दर्शविली आहे. फाऊंडेशनने सामाजिक समरसता, समान विकास आणि समुदाय सशक्तीकरण यांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले. असे अनेक कार्य हे दोन्ही उद्योजक समाजासाठी सेवा म्हणून करीत आहेत.

सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याच उद्योजकांविरुद्ध ज्या पद्धतीने विष पेरलं जातंय हे समाज, राज्य आणि देश यासाठी हानिकारक आहे व पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचा काही राजकीय मंडळींचा उद्देश आहे याबाबत आपण नेहमीच सतर्क राहिले पाहिजे.

जय हिंद, जय महाराष्ट्र 

पंकज जयस्वाल

अन्य लेख

संबंधित लेख