Tuesday, December 3, 2024

अमित शहांची आज हिंगोलीसह यवतमाळ आणि चंद्रपूर मध्ये सभा

Share

देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या आज महाराष्ट्रातील हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूर या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जाहीर सभांचं आयोजन केलं आहे. ही सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात येणार आहे. दुपारी १.१५ वाजता, रामलीला मैदानात अमित शहा यांनी जाहीर सभा होणार आहे. त्यांच बरोबर यवतमाळ मधील उमरखेड येथे अमित शहा यांची दुपारी २.१५ वाजता सभा होणार आहे आणि मग ३.४५ ला चंद्रपूर मधील चांदा क्लब ग्राउंड येथे सभा घेणार आहेत.

या सभेत अमित शहा महायुतीचा अजेंडा, राज्याच्या विकासाच्या योजना आणि केंद्र सरकारच्या विविध उपक्रमां सोबतच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील विकासाचे धोरणे आणि शेतकरी कल्याण योजनांवर भर देतील.या सभांच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुमांमध्ये नक्कीच फायदा होईल.

अन्य लेख

संबंधित लेख