Wednesday, November 27, 2024

ईव्हीएमवर विरोधकांचे आरोप आणि सरकार स्थापनेच्या विलंबाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका

Share

नागपूर : “महाविकास आघाडीचे 31 खासदार महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पाच महिन्यांपूर्वी निवडून आले होते. त्या वेळी ईव्हीएम (EVM) नीट काम करत होती का?” असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी पुढे सांगितले, “नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. त्या वेळी ईव्हीएम खराब नव्हती का? ईव्हीएमला दोष देण्याऐवजी विरोधकांनी आत्मपरीक्षण करायला हवे.”

सरकार स्थापन व्हायला वेळ का लागतोय?

“सरकार बनवण्यासाठी केवळ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याच्या शपथविधी पुरेसा नसतो. कोणत्या पक्षाकडे कोणती खाती असतील याचा विचार करावा लागतो, आणि यात काही काळ जाईल. मात्र, लवकरच सरकार स्थापन होईल,” असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “तीन पक्षांची मंत्रिपदं, पालकमंत्री पदांची विभागणी, आणि खाती वाटप या महत्त्वाच्या बाबींचा निर्णय घेतल्यानंतरच सरकार पूर्णत्वाला जाईल.”

अन्य लेख

संबंधित लेख