पुणे : पुणे येथील संकेत लोढा आणि त्यांची पत्नी भारती लोढा यांनी भारताच्या पेटंट कार्यालयाकडून त्यांच्या दोन महत्त्वाच्या संशोधनांवर पेटंट मंजूर करून घेतले आहे. या संशोधनांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) तंत्रज्ञानावर आधारित पोर्टेबल मशीन हृदयविकाराचे निदान करण्यासाठी आणि सर्व्हिकल कॅन्सरचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी पोर्टेबल डिव्हाइस यांचा समावेश आहे. ही दोन्ही उपकरणे आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती म्हणून गणली जात आहेत.
संकेत लोढा यांना एकूण सहा पेटंट्स मंजूर झाली आहेत तसेच त्यांनी 50+ संशोधन पत्रे प्रकाशित केली आहेत, जी UGC Care, ABDC आणि Scopus, IEEE यासारख्या प्रतिष्ठित प्लॅटफॉर्म्सवर आहेत. ते सध्या ऑस्ट्रेलियन बिझनेस डीन्स काउन्सिल जर्नलचे गेस्ट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. तसेच बेल्जियम युरोप येथील जरनल मधे Reviewer म्हणून काम पहातात. याशिवाय, त्यांनी दोन पुस्तके(C आणी Python) लिहिली असून बंगळुरू येथील BNMIT वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स कॉन्क्लेव्हमध्ये त्यांना रिसर्च एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे तसेच राज्यस्थरिय शिक्षकरत्न पुरस्कार मिळाला आहे आणी काही दिवसा पूर्वी सर्वोच्च पटेंट अवॉर्डने नवी दिल्ली येथे सन्मानीत करण्यात आले आहे ।
संकेत लोढा एमजीएम युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर येथून संगणक शास्त्रात पीएचडी करीत आहेत. त्यांच्या पत्नी, भारती लोढा या भौतिकशास्त्रात पीएचडी करीत आहेत.
संकेत आणि भारती लोढा यांचे हे संशोधन आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान असून, त्याच्या वापरामुळे हृदयविकार आणि सर्व्हिकल कॅन्सर यासारख्या आजारांचे निदान लवकर होऊन उपचारांची प्रक्रिया अधिक जलद आणि प्रभावी होणार आहे. यामुळे या क्षेत्रात एक नवीन क्रांती घडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.