Wednesday, April 2, 2025

शिवाजी महाराज कोण होते ? धर्मनिरपेक्ष की पुरोगामी?

Share

जर तुम्हाला एखादा समाज निस्तनाभूत करायचा असेल तर, सगळ्यात आधी त्या समाजाच्या इतिहासाची तोडफोड करून त्यावर नवीन मुलामा दिला जातो. हिंदू समाज खिळखिळा करण्यासाठी असे अनेक घात, हल्ले चिकाटीने केले गेले आहेत आणि आजही होत आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज कसे पुरोगामी होते हे त्यांच्या सोयीने दाखवले गेले. पण खरचं शिवाजी महाराज पुरोगामी होते? (इथे मूळ शब्द सेकुलर आहे ज्याचे योग्य मराठी भाषांतर “धर्मनिरपेक्ष” असे होईल)

इतिहासात याबद्दल काही पुरावे सापडतात ते पाहूयात –

१. १३ फेब्रुवारी १६६० हेन्री रेव्हिंग्टन (Henry Revington)

जो राजापूरच्या इंग्रजी कारख्यान्याचा (इथे मराठीतील वखार असा शब्द अपेक्षित आहे) मुख्य होता त्यानी शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात त्यांचा उल्लेख हा हिंदू सैन्याचे सेनापती (General of the Hindu Forces) असा केला आहे.

२. संभाजी महाराज यांच्या काळातील शिलालेख –

गोव्यातील १६८८ सालच्या एका शिलालेखात म्हटलं आहे की,

“पूवी येथे मुस्लिम राज्य होते, आता येथे हिंदू राज्य जाहले…” ”

यावरून हिंदवी स्वराज्याची स्थापना किंवा विस्तार कळतो. याचबरोबर कोल्हापूरच्या राजवाड्याबाहेर असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली असलेल्या ताम्रपटावर ठळकपणे “ हिंदूपदपादशाह ” ( हिंदुपदपातशाह असा शब्द हवा) उल्लेख केलेला दिसतो.

३. ज्योतीराव फुले –

महात्मा ज्योतीराव फुले एका ठिकाणी म्हणतात की,

“मोठ्या युक्‍तीने सर केला किल्ला तोरण्याचा | रोविला झेंडा हिदूंचा||”

महात्मा फुलेही शिवाजी महाजांच्या साम्राज्याची अस्तित्व अधोरेखित करतात.

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर –

२५ नोव्हेंबर १९४९ सालच्या त्यांच्या संविधान सभेमधील शेवटच्या भाषणात ते म्हणतात,

“शिवाजी महारांजा लढा हा हिंदूंच्या मुक्तीसाठी होता.”

बाबासाहेबांच्या वाक्यातील मुक्तता हा उल्लेख हिंदू धर्मासाठी आहे सर्व धर्मांसाठी नाहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

Reference: Shivaji was fighting for the liberation of Hindus – Dr. Babasaheb Ambedkar, Writings and Speeches (Vol. 13, Page 1214).

(Shivaji was fighting for liberation of Hindus – Dr. Babasaheb Ambedkar -Writings and Speeches ( vol.13, page 1214.)

५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम भरतीची अफवा (भरतीची अफवा ऐवजी “मुस्लीम होते का? असे करणे सोयीचे आहे) –

सर्वसामान्यपणे एक दावा असा केला जातो की, शिवाजी महाराज्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक होते. मात्र, महाराजांनी सावत्र भाऊ व्यंकोजी यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे की,

मुस्लिम सैन्याला घेऊना विजय कसा काय मिळवता येईल? ( मूळ वाक्य असे आहे “तुरुक फौजेत ठेविलियाने जय कैसा होतो?’)

त्यांच्या मनात असा विचार असेल तर ते कसे काय मुस्लिमांना सैन्यात भरती करून घेतील. वास्तविक, हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मुसलमान सैनिक शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. जे कालातंराने देशद्राही निघाले.

६. मशिद बांधण्याची बनावट कहाणी

रायगड जिल्ह्यात शिवाजी महाराजांनी एक मशिद बांधली अशी एक खोटी कहाणी सांगितली जाते. खरतरं, शिवाजी महाराजांनी कधीही कोठेही एकदी मशिद बांधली नाही. याउलट जिथे मंदिरे पाडून मशिदी उभारल्या गेल्या होत्या त्या नेस्तनाभूत (नेस्तनाबूत) केल्याचे असल्याचे पुरावे आढळतात.

डॉ. फ्रायर नावाच्या इंग्लिश प्रवाशाच्या एका कागदपत्रामध्ये याची नोंद आढळते. तो म्हणतो, शिवाजी महाराजांनी जिथे जिथे मंदीरांच्या जागी मशिदी उभ्या केल्या त्या नेस्तनाभूत केल्या आहेत.

Reference: New Account of East India and Persia – Nine Year Travels, Dr. Fryer.

७. जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतर कारवाई

१६६७ च्या करारानंतर, गोव्यामध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंकडून जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरावर शिवाजी महाराजांनी कडक कारवाई केली होती. जर शिवाजी महाराज हे धर्माभिमानी नसते तर त्यांनी मिशनऱ्यांवर कारवाई का केली असती?

८. युरोपीयन धर्मगुरूंच्या नजरेतून

जेसुइट पुजारी मॅफी, भारत दौऱ्यावर आला होता,

शिवाजी हा योध्दा जरी असला तरी, तो धर्माभिमानी आहे. तो कधीही देवांना नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही. तो कधीही ब्राम्हणांना आणि हिंदू पुजाऱ्यांना डावलत नाही.

Reference: Maffei’s Account (Jesuit Missionary, 1672).

९. कवींद्र परमानंद यांचे शिवभारत (१६७३)

“शिवाजी महाराजांचा जन्म हा धर्म पुर्नस्थाप आणि रक्षणासाठी झाला, त्यांनी मंदिरांची पुर्नबांधणी केली, संस्कृत विव्दान आणि वैदिक संस्कृतीचे जतन केले.”

Reference: Shivbharat (1673), Kavindra Paramananda Nevaskar.

१०. चिटणीस बखर (१८१०)

महाराजांनी मंदिरांमध्ये पूजा सुरू केल्या आणि अनेक धार्मिक स्थळे हे मुघलांच्या तावडीतून सोडवली.

Reference: Chitnis Bakhar (1810).

याशिवाय, समकालीन कवी भूषण यांनी शिवाजी महाराजांची स्तुती काही रचनांमधून केली आहे. ते म्हणतात,

१) रा पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत,
सिद्ध की सिधाई गई, रही बात रब की।
कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई
शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी॥

२) कुम्करण असुर अवतारी औरंगजेब,
कशी प्रयाग में दुहाई फेरी रब की।
तोड़ डाले देवी देव शहर मुहल्लों के,
लाखो मुसलमाँ किये माला तोड़ी सब की॥

३) भूषण भणत भाग्यो काशीपति विश्वनाथ
और कौन गिनती में भुई गीत भव की।
काशी कर्बला होती मथुरा मदीना होती
शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की ॥

जर शिवाजी महाराज नसते तर, मोठ्या प्रमाणात धर्मांतर होऊन सर्वजण मुसलमान झाले असते.

शिवाजी महाराजांनी या रचनांची नुसती स्तुती नाही केली तर, कवीराज भऊषण यांचा सन्मान केला. जर ते पुरोगामी असते तर, त्यांनी या रचना लिहिणाऱ्याला प्रोत्साहन न देता त्याला विरोध केला असता.

जेव्हा हे सर्व संदर्भ लक्षात घेऊन नि:पक्षपणे अभ्यासले जातात तेव्हा हेच संदर्भ पुरावे बनतात की, शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये “गो-ब्राम्हण प्रतिपालक” आणि “हिंदू व हिंदूत्वाचे”रक्षण केले. ते कधीही पुरोगामी नव्हते तर धर्माभिमानी होते.

अन्य लेख

संबंधित लेख