Friday, May 9, 2025

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Share

सोयगावमधील हिंदू तरुणांच्या आंदोलनाला यश

छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील अफरोज नजीर पठाण या तरुणाने स्वतःच्या इंस्टाग्राम वर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा व औरंगजेबाचे गुणगान करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता. यामुळे सोयगाव पोलिस स्टेशन येथे संबंधित आरोपी तरुणावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका यावेळी गावातील शिवभक्तांनी घेतली. त्यामुळे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, कलम 299 अंतर्गत आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला.

यावेळी मोठ्या संख्येने हिंदू तरुणांनी आंदोलनात केले. तत्पूर्वी बहुलखेडा येथे आरोपीच्या समर्थनात काही तरुण पुढे आल्यामुळे दोन गट समोरासमोर आले होते. आरोपी समर्थक गटातील तरुणांच्या हातात तलवारी व दांडके दिसून आले. यावेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत जमाव पांगवला व परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर सोयगाव पोलिस स्टेशन येथे पोलिसांनी जमलेल्या हिंदू तरुणांचे ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

समाजकंटक आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक
आपले आदर्श छत्रपती संभाजी महाराज असून, औरंगजेब हा आपला शत्रू होता. औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणीही भारतीय सहन करू शकत नाही. त्यामुळे अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून समाजात तेढ निर्माण होणार नाही व शांतता सुव्यवस्था राहील. अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते राजुभाऊ फुसे यांनी दिली.
– राजुभाऊ फुसे

अन्य लेख

संबंधित लेख