Wednesday, July 9, 2025

Nagpur : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नागपूरमधील पावसाचा आढावा

Share

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज नागपूर (Nagpur) शहर आणि जिल्ह्यातील पावसाच्या (Rain) सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्याकडून त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

सध्या नागपूरमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांच्या टीम पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदतकार्य सुरू करता येईल.

मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने आज (९ जुलै २०२५) जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी देखील आवश्यक काळजी घ्यावी आणि आपल्या सुरक्षिततेची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्यास आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख