Wednesday, November 19, 2025

राज ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा झटका! मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष भाजपमध्ये दाखल

Share

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा झटका बसला आहे. मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश केला. मुंबई (Mumbai) येथील महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रमेश परदेशी यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

मनसेसाठी हा मोठा धक्का

रमेश परदेशी हे मनसेच्या चित्रपट आघाडीमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांच्या भाजप प्रवेशाने मनसेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. परदेशी यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील झाल्याची माहिती आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी परदेशी यांचे पक्षात स्वागत केले आणि आगामी निवडणुकीत त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मनसे आणि उद्धव सेना यांच्या संभाव्य युतीच्या चर्चा सुरू असतानाच, मनसेच्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मुंबई आणि राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

अन्य लेख

संबंधित लेख