Thursday, October 24, 2024

पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल यांच्याकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल

Share

पर्वती मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ मात्र

सध्या महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसपक्ष, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारी म्हणून गुरुवारी तीन अर्ज दाखल केले आहेत.
पर्वती विधानसभा मतदारसंघात १९७८ च्या निवडणुकांपासून २०२४ पर्यंत काँग्रेस पाचवेळा आणि भाजप तीनवेळा जिंकली आहे. या सर्व लढती चुरशीच्या झाल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीत येथे भाजपचे मताधिक्य कमी झाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत पर्वती मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. महायुती की महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पर्वती मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ असून या ठिकाणी मुस्लिम, दलित, ओबीसी व मराठा अशा सर्व जाती-धर्माचे संमिश्र मतदान आहे. यामुळे पर्वती मतदारसंघाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख