Saturday, July 27, 2024

माझी आई माझ्यासोबतच आहे..; अजित पवार यांनी ठणकावून सांगितले

Share

बारामती लोकसभा : आज लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले येथे मतदान सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), आई आशाताई पवार सह सर्व कुटुबांने काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला.

कुटुंबियांचा सपोर्ट नाही असं म्हटलं जात होतं, त्यावर अजित पवार म्हणाले की, परंतु माझी आई माझ्यासोबतच आहे. त्या पुण्यात आमच्या नातेवाईकांचे लग्न होते. त्यासाठी गेल्या होत्या. त्यांनीच मला मतदानासाठी येण्याचे सांगितले. आता त्या मतदानासाठी माझ्या सोबत आल्या आहेत. आईचा मला आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे. कारण शेवटी ती माझी आई आहे, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आईचा हात हातात घेऊन मतदान केंद्रावर आले. मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर माध्यमांनी मोठी गर्दी केली होती. अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. सर्व पवार कुटुंब तुमच्या विरोधात आहेत. असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सांगितले की, पवार कुटुंब खूप मोठे आहे. आमच्या परिवारातील श्रीनाथ पवार, राजेंद्र पवार आणि साहेब (शरद पवार) ही लोकच विरोधात आहेत. इतर सर्व माझ्या सोबत आहेत. आता विधानसभेची निवडणूक लागेल तेव्हा कोण कुठे प्राचार करेल, हे तुम्हाला दिसेल.

अन्य लेख

संबंधित लेख