सातारा लोकसभा : ‘आज मी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे. तो मी अनेक चव्हाण साहेबांची पुस्तके वाचून’, हा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ‘चव्हाण साहेबांनी सांगितलंय, साहेबांच्यावर पण काही राजकीय संकटं आली, चढ-उतार आले. त्याचे तुम्ही-आम्ही साक्षीदार आहेत. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय. तुम्हाला शेवटचा माणूस म्हणजे, “बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल, तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते”, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत अजित पवार बोलत होते. ‘आज मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये, मी सत्तेला हापापलेलो माणूस नाही आहे. पण चव्हाण साहेबांचा विचार, चव्हाण साहेबांनी आज जो दाखवलेला रास्ता आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा दिलाय त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न मिळला पाहिजे अशी मागणी त्यात केली आहे’, असेही अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘पहिल्यांदाच राजकीय जीवनामध्ये cabinet मंत्रीपदाची शपथ मला घ्यावी लागली. आणि त्याच्यानंतर पहिलं पालकमंत्री पद या जिल्ह्याचं मला मिळालं. आणि हा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे. अतिशय प्रेमळ असे कार्यकर्ते जीवाला जीव देणारे कार्यकर्ते याचा अनुभव मी मी त्या नव्व्याण्णव ते दोन हजार चार सालामध्ये घेतला’, असंही ते यावेळी म्हणाले.