Monday, October 7, 2024

संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल

Share

महाराष्ट्र : राज्यात सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचाही चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही राळेगण सिद्धी (Ralegan-Siddhi) मध्ये मतदानाचा हक्क बजावला. भाजपाचा (BJP) संविधान (Constitution) बदलण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) सातत्यानं करण्यात येत आहे. यावर अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

“कोणत्याही सरकारने किंवा पक्षाने संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल. परंतु संविधान बदलण्याची गरज काय? भारताचे संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे. त्यात कोणीही बदल करण्याचा प्रयत्न करू नये”, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना अण्णा हजारे यांनी दिली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख