लष्कराला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्याच्या मोहंमद युनूस यांच्या निर्णयावर बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीनं चिंता व्यक्त केली आहे. यामुळे नव्या समस्या निर्माण होतील असं पक्षाचे सरचिटणीस मिर्झा फक्रुल इस्लाम आलमगीर यांनी म्हटल आहे. या निर्णयाचा फेर विचार करण्याचं आवाहन त्यांनी हंगामी सरकारला केलं आहे. प्रशासनाला कायदा आणि सुव्यस्था राखण्यात अपयश आल्याचं यामुळे दिसून येत असल्याचा दावा आलमगीर यांनी केला आहे.
Bangladesh: लष्कराला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्याच्या निर्णयावर बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीची चिंता
Share
अन्य लेख