Thursday, November 21, 2024

बीडमधील वंजारी-मराठा वादावर फडणवीसांचं वक्तव्य

Share

नागपूर : बीडमध्ये (Beed) वंजारी-मराठा समाज एकमेकांच्या विरोधात वाद निर्माण झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर मध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बीडमध्ये असं काही घडणार नाही. दोन्ही समाज वर्षानुवर्षे सोबत राहिलेले आहे. त्यामुळे काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण असा प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नये. दोन्ही समाजातील जाणत्या लोकांनी असे प्रयत्न करणाऱ्याला थांबवलं पाहिजे,” असे ते म्हणाले.

१७ मे २०२४ रोजी वंजारी समाजाची मुंडेवाडीमध्ये गावातील मंदिराच्या पारावर बैठक झाली. या बैठकीत वंजारी समाजातील लोकांनी एक ठराव केला. वंजारी समाजबहुल दोन गावांनी मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा ठराव केला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या दुकानावर जायचे नाही, मराठा समाजाच्या किर्तनकाराला किर्तनाला बोलवायचे नाही, मराठा समाजाच्या चहाच्या हॉटेलवर जायचे नाही, असे काही नियम होते. तसेच जो कुणी हा नियम मोडेल त्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. या बैठकीचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता.

अन्य लेख

संबंधित लेख