Thursday, November 7, 2024

उद्धटपंत, भ्रामक कल्पनेत वावरू नका; भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेला फटकारलं

Share

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला होता. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा भाषेत उद्धव यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले होते. या वक्तव्यानंतर भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच फटकारलं आहे.

त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे खरं बोललात, देवेंद्र फडणवीसच राहतील! देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाची कावीळ झालेले अनेक कावीळग्रस्त सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत आहेत, त्यातील एक उद्धटपंत तुम्ही आहात ! हिंदुत्व सोडून आणि वडिलांच्या विचारांशी प्रतारणा करून तुम्ही दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्ता उबवली. पण, उसने कर्तृत्व फार काळ टिकले नाही. सत्तेवर असताना घरी बसलात, सत्ता गेल्यावर तर कायमचे घरी बसणे नशिबी आले.

ऊठसूठ देवेंद्र फडणवीसांवर गरळ ओकण्यासाठी एकाला तुम्ही कायमचे पाळलेले आहेच. त्याने पक्षाचे वाटोळे केले, तरी तुमचे डोळे उघडत नाहीत, हे दुर्दैव! त्याच्या पावलावर पाऊल टाकत तुमची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झाली आहे!

उद्धटपंत, भ्रामक कल्पनेत वावरू नका, वास्तवाला सामोरे जा. तुम्ही म्हणता ते एकदम मान्य.. महाराष्ट्रातील जनताच म्हणू लागली आहे, आम्हाला मा. देवेंद्रजी पाहिजेत, बाकी सब झूठ हैं ! असे म्हणत वाघ यांनी ठाकरेंवर टीका केलीय.

अन्य लेख

संबंधित लेख