Friday, February 20, 2026

भाजपच्या संघटन बांधणीला मिळणार नवी गती! महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा दिमाखदार शुभारंभ

Share

मुंबई : भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ हा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या अभियानाबद्दल माहिती देत हे अभियान राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

हे महाभियान केवळ राजकीय नसून ते समाजसेवा आणि संघटनात्मक बांधणीवर आधारित आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाची विचारधारा, पंडितजींचे तत्वज्ञान आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचवायच्या, याचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे. “समाजातील शेवटच्या माणसाचा विकास हाच आमचा ध्यास आहे,” असे चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.

या शुभारंभ प्रसंगी भाजपचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, गुजरातचे माजी प्रदेशाध्यक्ष के.सी. पाटील, प्रदेश महामंत्री आमदार संजय केनेकर, राजेश पांडे, माधवी नाईक, रवि अनासपुरे, विजय चौधरी, पवन त्रिपाठी यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि मंडल पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख