Wednesday, December 4, 2024

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील – बावनकुळेंचा विश्वास

Share

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू असा इशारा त्यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. या विधानसभेच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. यातच ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
काही मतदारसंघात बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली तेथे काहीजण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. या बरोबरच माहीम विधानसभा मतदारसंघावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून सदा सरवणकर आपली उमेदवारी मागे घेतात का? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील हे आज आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

अन्य लेख

संबंधित लेख