महाराष्ट्रमध्ये नगरपरिषद, नगर पंचायत निवडणूका पार पडल्या असून भाजपची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. भाजपा ११७ अधिक तर महायुती २०७ विजयी होऊन भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्रातील जनता जनार्दन भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे स्पष्ट झाले असल्याने विरोधी महाविकास आघाडीची दाणादाण झाली आहे. महायुती तथा भाजपाच्या विजयामुळे मुंबईत ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणे चांगली घटना म्हणावी लागेल. कारण मुंबईच्या जडणघडणीमध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाचे मोठे योगदान असून ते नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या एकत्र येण्याचा फारसा फायदा होणार नाही असे चित्र पाहावयास मिळत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय चमत्कार होईल हे मात्र कोणीही सांगू शकत नसले तरी भाजपची घोडदौड कोणी थांबवू शकणार नाही असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मुंबईत महायुतीने विशेषतः भाजपाने मराठी-अमराठी मुद्द्याला बगल देऊन हिंदू एकतेवर आपले सर्व लक्ष केंद्रित केले आहे. हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेऊन मुंबई मधील २७४ वॉर्ड्समध्ये विजयाची रणनीती आखली केली आहे. मकरसंक्रातीनंतर दुसऱ्या दिवशी दि. १५ जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचे मतदान होणार आहे. मुंबईचा मतदार तिळगुळ देऊन घेऊन कोणा सोबत गोड बोलणार याचा कौल देणार आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकांमध्ये भाजपाची विजयी घोडदौड दिसली आहे. तीच घोडदौड मुंबईत दिसेल याची शक्यता नाकारता येत नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे महायुतीने विशेष लक्ष देत असून मुंबईच्या विकासासोबत मुंबईची सुरक्षा सुद्धा महत्वाची असल्याचे भाजपचे मत आहे. काही महिन्यांपुर्वी म्हणजे महानगरपालिका निवडणुक जाहीर होण्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी मुंबईमध्ये महाविकास आघाडी बहुमताने निवडून आल्यास मुंबई कॉंग्रेसचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याप्रमाणे मुंबईचा महापौरही खान होऊ शकतो? असे गांभीर्यपूर्ण सूचक वक्तव्य केलेलं होत. सोबतच युरोपमधील इंग्लंडचे महापौर सादिक खान आणि अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील महापौर जोहरान ममदानी यांची आठवण करून देऊन तेथे काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचे विवेचन सुद्धा केले आहे. परंतु मुंबईकरांनी तेव्हा त्यांच्या सूचक वक्तव्याची दखल घेतली नव्हती पण आता छत्रपती संभाजीनगरमधील रशीद मामू यांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश झाला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. संभाजीनगरमधली रशीद खान कोण आहे आणि त्याचे कारनामे काय आहेत तसेच दंगलीच्या गंभीर गुन्हाच्या नोंदी सर्वश्रुत असल्याने पक्षाअंतर्गतच रशीद मामू यांना विरोध सुद्धा होऊ लागला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई बॉम्बस्फोट आरोपी याकूब मेमन याच्या सुटकेसाठी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर महाविकास आघाडीत घटक असलेल्या अस्लम शेख यांनी स्वाक्षरी केली होतो आणि त्यांनाच मुंबईचे पालकमंत्री करण्यात आले होते तसेच याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण आणि मुंबईमधील विकास कामाचे टिपू सुलतानचे नामकरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झाले आहे आणि हे सर्वप्रकार मुंबईतील सामान्य माणूस विसरला नाहीये. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला विजय मिळाल्यास उध्दव ठाकरे मुंबईचा महापौर मराठी ऐवजी खान करतील की काय? अशी शंका मुंबईतील सामान्य माणूस व्यक्त करीत असून परिवर्तन अटळ असल्याचे बोलत आहे. मुंबई शहराला पहिलेच अवैध्य बांगलादेशी आणि घुसखोर रोहिंग्यांनी विळखा घातलेला आहे त्यांच्यामुळे अनेक वेळा मुंबईची सुरक्षा धोक्यात आली आहे. वर्ष १९९३ च्या बॉम्बस्फोटांनंतर आझाद मैदानावरील रजा अकादमीचा हिंसक मोर्चा मालवणी पॅटर्न, लव्ह जिहाद, व्होट जिहाद आणि लँड जिहादच्या बेधुंद राक्षसाने मुंबईमध्ये अनेक वेळा नंगानाच केला आहे व आता ही पुन्हा आपले डोके वर काढले आहे त्यामुळे अमित साटम यांनी मुंबईचा महापौर खान होईल का? व्यक्त केलेल्या चर्चेला हलक्यात न घेता गांभीर्याने विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही भाजपासाठी आव्हान जरी असली तरी हे आव्हान पेलण्यास भाजपा समर्थ असल्याचे मुंबईमधील जाणकारांचे मत आहे. भाजपचा विजयी अश्व केरळपासून बिहारपर्यंत देशाच्या विविध भागामधील निवडणुकांमध्ये सतत विजयी ठरत आहे. मुंबईच्या सुरक्षा आणि विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका मिशन यशस्वी होईल अशी मुंबईकरांमध्ये चर्चा आहे.
-अशोक राणे
भ्रम.९४२३६५८३८५