Friday, October 18, 2024

‘चुकून मविआला मत गेलं तर महाराष्ट्राचा बट्टयाबोळ होईल;’ बावनकुळेंचा मविआवर प्रहार

Share

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. यामुळे, महायुती आणि महाविकास आघाडी यांचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करतांना दिसत आहेत. दरम्याम, “चुकून मविआला मत गेलं तर मविआ महाराष्ट्राचा बट्टयाबोळ करतील,” अशी टीका भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडी (MVA) वर टीका केली आहे.

“केंद्र आणि राज्य हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या जनतेकरिता मजबूतीने काम करणार आहे. महाविकास आघाडीकडे केंद्रात सरकार नाही. त्यामुळे ते कधीही केंद्राचा समर्थन घेणार नाही. त्यामुळे चुकून मविआला मत गेलं तर मविआ महाराष्ट्राचा बट्टयाबोळ करतील,” अशी टीका त्यांनी यावेळी मविआ वर केली. तसेच, ते म्हणाले महायुती डबल इंजिन सरकार म्हणून चांगलं काम करेल असे ते शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख