मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. आणि शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणारं नाहीत यावर शिक्कामोर्तब झाले. अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महायुतीला मिळालेलं बहुमत बघता, युती पुन्हा सत्ता स्थापन करेल. यामध्ये मुख्यमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस (भाजप), उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (शिवसेना) आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) शपथ घेतील.
याशिवाय मंत्री म्हणून कोण शपथ घेणार हे माहिती नसलं तरी कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद याची शक्यता वर्चतवण्यात आली आहे. स्वाभाविक भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे जास्त मंत्री असतील, शिवसेनेला (शिंदे गट) 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपाला २१, शिवसेनेला १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रायल राहील. अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रालय कायम राहील. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे अर्बन डेव्हलमेंट खातं देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.