मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले.
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेवून शासनाची भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.