Wednesday, December 4, 2024

“बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी थोबाड फोडलं असतं”:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरविंद सावंत यांनी केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे .अरविंद सावंत यांनी एका सभेत बोलताना शायना एन. सी. यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले होते.याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो. या केलेल्या विधानानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं. लाडक्या बहिंणीबाबत असं विधान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही.”

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ही भाषा आणि विधानं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला अनुसरून नाहीत. त्यांनी सतत स्त्रियांच्या आदराचं संदेश दिलेला आहे. आम्ही सर्वांनी त्यांच्या विचारांना चांगल्या पद्धतीने पालन करावं आणि आचरणात आणावं. अरविंद सावंत यांचं विधान हे आपल्या संस्कारांना आणि मर्यादांना बहुधा धक्का देणारं आहे.”

यावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात मर्यादा असतात. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर हे सिद्ध केलं. आम्ही सर्वांनी त्यांच्या शिकवणुकीला मान देणं गरजेचं आहे. असे विधानं समाजात विषमता निर्माण करतात आणि हे बाळासाहेब असते तर त्यांना मान्य नसतं.”

अन्य लेख

संबंधित लेख