विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. यानंतर राज्यभरातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढली कारण येथील माजी महापौर व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे या कालपासून नॉट रिचेबल आहेत.
सध्या राज्यभरात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायल मिळत आहे. यामुळे आपापल्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे आव्हान राजकीय पक्षासमोर उभे ठाकले आहे. यासाठी राजकीय पक्ष बंडखोरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेतय.
काँग्रेसच्या वरिष्ठांकडून देखील कमल व्यवहारे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कालपासून कमल व्यवहारे नॉट रिचेबल असल्याने पक्षाची डोकेदूखी वाढली आहे. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी दोन दिवसापूर्वी बंडखोरांच्या घरी जाऊन बैठका घेतल्या होत्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. असे सांगण्यात येत आहे.