Monday, December 2, 2024

“महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट रचला जात आहे”; निलेश राणेंचा धक्कादायक दावा

Share

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आयोजित निषेध मोर्चाच्यावेळी ठाकरे आणि राणे समर्थकांच्या दोन्ही गटात जोरदार राडा झाला होता. यानंतर निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक्स वर धक्कादायक पोस्ट केली आहे. “महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा दंगली घडवण्याचा कट रचला गेला जात आहे” असा दावा केला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हणालेत कि “महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा दंगली घडवण्याचा कट रचला गेला जात आहे… मालवण नंतर रत्नागिरीमध्ये काल रात्री मारुती मंदिर जवळ मावळ्यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली. या घटना फार विचार करून आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या आहेत. हिंदू समाजाने आता मागे हटायचं नाही, यांचा बंदोबस्त आता करावाच लागेल. असं ते म्हणालेत. तसेच त्यांनी आपण सगळ्यांनी तिथेच जमायचं आहे असं आवाहन देखील केलय.

अन्य लेख

संबंधित लेख