Tuesday, September 17, 2024

महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प बांधकाम

Share

महाराष्ट्रातून मार्गक्रमण करणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या 135 किमी लांबीच्या
बहुतेक एलिव्हेटेड सेक्शनचे बांधकाम सुरु असून हा विभाग, गुजरात-महाराष्ट्र सीमेजवळील शिळफाटा
आणि झरोली गावादरम्यान ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मुंबई महानगर
क्षेत्रातील 95 गावे आणि शहरांमधून मार्गक्रमण करेल.135 किमी पैकी 124 किलोमीटरमध्ये पोलादापासून बनवलेल्या 11 पुलांसह व्हायाडक्टदेखील असणारआहेत. तसेच डोंगरातून जाणारे ७ बोगदे असतील. ठाणे, विरार आणि बोईसर-ठाणे येथे रोलिंग स्टॉकडेपोसह तीन स्थानके नियोजित आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग, समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर, मुंबई उपनगरीय मार्ग आणि एलिव्हेटेड
मुंबई मेट्रो लाईन 5 यासह अनेक प्रमुख पायाभूत सुविधांचा यामध्ये समावेश असेल.
उल्हास नदीवरील ४६०-मीटरचा पूल सर्वात आव्हानात्मक राहणार आहे. तर सर्वात लांब पूल वैतरणा
नदीवर 2.32 किमी लांबीचा असेल.उत्तर-पश्चिम महाराष्ट्रातील वन्यजीवांसाठी काही पर्यावरणीय आकर्षक ठिकाणे असून संजय गांधीराष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य यांचा त्यात समावेश आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणावर विपरित परिणाम होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मुंबईपासून जवळ असल्याने रेल्वे मार्ग आणि महामार्गांसह इतर पायाभूत सुविधांचे प्रकल्पही येत
आहेत. बांधकामाच्या प्रगतीमध्ये भू-तांत्रिक तपासणी पुर्णत्वाच्या मार्गावर असून पर्वतीय बोगद्यांचे काम सुरू
करण्याचे नियोजन असून बोईसर आणि विरार स्थानकांवरही पायाभरणीचे काम सुरू झाले आहे.
या महत्त्वपूर्ण विभागाचे बांधकाम जसजसे पुढे जात आहे, तसतसे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन
प्रकल्पामुळे या प्रदेशाचा कायापालट होताना लवकरच दिसून येईल.

अन्य लेख

संबंधित लेख