Saturday, December 21, 2024

कोथिंबीरीची जुडी चारशे रुपयांवर, इतरही भाज्यांचे भाव वधारले

Share

पालेभाज्यांअभावी घास कोरडा

ऐन गणेशोत्सवाच्या काळात पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावरती परिणाम झाल्यामुळे कोथिंबीरीची
जोडी ही चारशे रुपयांना विकली जात आहे तर इतर पालेभाज्यांचे भाव देखील कडाडल्यामुळे
पालेभाज्या आता ताटातून गायब झाल्या आहेत परिणामी घास कोरडा पडल्याची जाणीव होत आहे.


पावसामुळे पालेभाज्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे आवक घटली असून नाशिक कृषी उत्पन्न
बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात गावठी कोथिंबीरला किमान दहा हजार रुपये तर सर्वाधिक ४०
हजार रुपये प्रति शेकडा असा भाव मिळाला. रोजच्या जेवणातील पदार्थांची चव वाढवणारी कोथिंबीर
महागल्याने खवय्ये नाराज झाले आहेत.


बाजार समितीत रविवारी सायंकाळी लिलावात गावठी कोथिंबीर किमान ६५ रुपये जुडी ते सर्वाधिक
४०० रुपये जुडी, चायना कोथिंबीर किमान ४० तर सर्वाधिक २८० रुपये जुडी, मेथी किमान ५० तर
सर्वाधिक १३० रुपये जुडी, शेपू किमान २२ तर सर्वाधिक ५७ रुपये जुडी, कांदापात किमान १५ तर
सर्वाधिक ४२ रुपये जुडीला भाव मिळाला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख