Saturday, March 7, 2026

तूच आहेस तुझ्या विनाशाचा शिल्पकार: CPI

Share

गुरुवार, ५ मार्च २०२६ रोजी एक बातमी आली आहे. सोलापूरच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI-M) वतीने माजी आमदार नरसैय्या आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून, घोषणाबाजी करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. आणि अमेरिका- इस्त्रालयच्या इराणवरील हल्ल्याचा निषेध करून इराणला पक्षाचे समर्थन असल्याचे सांगितले.

त्याचवेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) फेसबुक पेजवर पक्षाचे एक शिष्टमंडळ इराण दूतावासात जाऊन पक्षातर्फे अमेरिका इस्त्राएलचा निषेध करून, इराणी जनतेला पाठिंबा देऊन तसेच भारत इराण मैत्री झिंदाबादची ग्वाही देऊन आले अशी पोस्ट झळकली आहे.

इराणचे सर्वेसर्वा आणि बाराइमामी शिया पंथाचे जगातील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूबाबत भारत सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी आपला अमेरिका-इस्त्राएलच्या विरोधाचा मुस्लीम लांगूलचालनाचा पर्यायाने भाजप मोदी विरोधाचा आणि हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेतला.

काश्मीर प्रश्नावरून कायम इस्लामिक रिपब्लिक पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर भारताला “न्याय्य धोरण” (just policy) स्वीकारण्याचे आवाहन करण्याचा आगाऊपणा करणाऱ्या, २०२० च्या दिल्ली दंगलींना “मुस्लिमांची कत्तल” असे संबोधून ‘#IndianMuslimsInDanger’ हॅशटॅग वापरून टीका करणाऱ्या, भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) ‘मुस्लिम विरोधी’ म्हणणाऱ्या, इराणच्या अयातुल्ला अली खामेनी यांना भारत सरकारने श्रद्धांजली का वहावी? याचे उत्तर भारतातील कम्युनिस्टांनी दिले पाहिजे.

भारत सरकारने इराणला कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली तर शियाबहुल इराणने जितक्या सुन्नी बहुल आखाती देशांवर हल्ला केला आहे त्या देशांमध्ये नोकरी व्यवसायासाठी गेलेल्या सुमारे १ कोटी भारतीयांचे (त्यात आमचे भारतीय मुस्लिम नागरिक लक्षणीय संख्येने आहेत) जीवित पणाला लावले जाईल. त्याची जाणीव भारतातल्या कम्युनिस्टांना नाही का?

भारतातील बाराइमामी शिया पंथीयांना खुश करण्याच्या नादात भारतातील कम्युनिस्टांनी देशातील समस्त सुन्नी मुसलमानांना आज आपले शत्रू करून घेतले आहे. भाजप… मोदी… हिंदू द्वेषाने आंधळ्या झालेल्या भारतातील कम्युनिस्टांना यातील काहीच दिसत नाहीये असेच म्हणावे लागते.

आणि यदाकदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर दबाव आणून त्यांना इराणला पाठिंबा देण्यासाठी भाग पाडण्याचा सापळा जर कम्युनिस्ट पक्ष लावू बघत असतील तर “राष्ट्र सर्वोपरी”ने ओथंबलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय रसायन आहे हे त्यांना गेल्या २३ वर्षात कळलेलेच नाही असेच म्हणावे लागेल.

भारतीय कम्युनिस्ट (साम्यवादी)… दोन बापांची पैदाईश…

१७ ऑक्टोबर १९२० रोजी तेव्हाच्या सोव्हिएत युनियन (USSR) मधील ताश्कंद (आताचे उझबेकिस्तान) येथे मानवेंद्रनाथ रॉय (एम.एन. रॉय), ईव्हलिन रॉय-ट्रेंट आणि अबनी मुखर्जी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची (CPI) स्थापना केली होती.

तर पुढे २६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूर येथे झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट परिषदेत भारतात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची (CPI) अधिकृतपणे स्थापना झाली. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून सिंगारवेलू चेट्टियार होते, तर एस.व्ही. घाटे हे पक्षाचे पहिले सरचिटणीस बनले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानुसार (CPI-M) कम्युनिस्ट चळवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर १९२० मध्ये सुरू झाली. तर CPI नुसार भारतात प्रत्यक्ष संघटनात्मक कार्य १९२५ च्या कानपूर परिषदेपासून सुरू झाले. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) २६ डिसेंबर १९२५ ही तारीख आपली स्थापना तारीख मानतो. म्हणजे रशियाकडून आपल्या वैचारिक अधिष्ठानाची उधार उसनवारी करणाऱ्या आणि यावर्षी आपले शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची पैदाईश दोन बापांची आहे असे मानायला हरकत नाही.

देशद्रोह हाच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा DNA…

१ सप्टेंबर १९३९ ला सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला भारतीय कम्युनिस्टांनी या युद्धाला “साम्राज्यवादी युद्ध” म्हटले आणि ते ब्रिटनच्या विरोधात उभे राहिले. कारण त्यावेळी रिबेनट्रॉप करारामुळे सोविएत युनियन तटस्थ होता.

मात्र, २२ जून १९४१ रोजी जर्मनीने सोव्हिएत युनियनवर (USSR) आक्रमण केले आणि सोव्हिएत युनियन ब्रिटनचा मित्र बनला. त्यानंतर, “मॉस्कोकडून मिळालेल्या सूचनेनुसार” भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपली भूमिका बदलली आणि या युद्धाला “पीपल्स वॉर” (लोकयुद्ध) जाहीर केले. व्हॉट अ पलटी सरजी…

जेव्हा महात्मा गांधींनी १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाची हाक दिली तेव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या आंदोलनाला विरोध केला. त्यांच्या मते, ब्रिटनच्या विरोधात आंदोलन करणे म्हणजे “फॅसिझम” विरोधात लढणाऱ्या सोव्हिएत युनियनच्या मित्रपक्षाला (ब्रिटनला) कमकुवत करणे होते.

कम्युनिस्टांनी केवळ आंदोलनापासून लांब राहणेच पसंत केले नाही, तर त्यांनी ब्रिटीशांच्या युद्धप्रयत्नांना सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी कामगारांना संपावर न जाण्याचे आवाहन केले आणि ब्रिटीशांसाठी निधी गोळा करण्यास मदत केली.

अनेक ऐतिहासिक कागदपत्रांनुसार आणि आरोपांनुसार, कम्युनिस्टांनी ब्रिटीश सरकारला गुप्त माहिती पुरवून भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना पकडवून देण्यास मदत केली होती.

आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कम्युनिस्टांनी “जपानचे एजंट” किंवा “फॅसिस्टांचे हस्तक” म्हणून हिणवले होते. कारण भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा सोविएट युनियनच्या राजसत्तेला आपला औरस आणि भारतवर्षाला आपला अनौरस बाप मानत होती. आणि सहाजिकच भारतीय कम्युनिस्ट पक्ष या संततीचा ओढा पूर्णपणे औरस बापाकडेच होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा DNA हा देशद्रोहाचा विश्वासघाताचा गद्दारीचा आहे हे २२ जून १९४१ नंतरच्या त्यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील देशद्रोही भूमिकेवरून स्पष्ट होते.

अखंड भारताचे मारेकरी… भारतातील साम्यवादी…

१४ ऑगस्ट १९४७ रोजी इतिहासात पहिल्या प्रथम धर्माच्या आधारावर आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन झाले. अखंड भारताच्या मारेकऱ्यांपैकी एक प्रमुख मारेकरी होता भारताचा कम्युनिस्ट पक्ष.

१९४२ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक नेते गंगाधर अधिकारी यांनी एक प्रबंध मांडला त्याला ‘अधिकारी थिसिस’ म्हटले जाते. यात त्यांनी असा युक्तिवाद केला की, भारत हा एक राष्ट्र नसून विविध ‘राष्ट्रीयत्वांचा’ (nationalities) समूह आहे. ज्याप्रमाणे माणूस म्हणजे आत्माधारी देह नसून अवयवांचा फक्त एक समूह आहे.

भारतीय कम्युनिस्टांच्या मते, प्रत्येक भाषिक आणि सांस्कृतिक समूहाला (उदा. पंजाब, सिंध इत्यादी) भारतापासून वेगळे होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार असावा याच आधारावर त्यांनी मुस्लिम लीगच्या मुसलमानांसाठी ‘स्वतंत्र मातृभूमीच्या’ मागणीचे समर्थन केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या या भूमिकेमुळे मुस्लिम लीगच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या मागणीला एक ‘प्रगतशील’ आणि ‘लोकशाही’ स्वरूप मिळण्यास मदत झाली. ज्यामुळे हिंदुस्तानच्या फाळणीचा मार्ग अधिक प्रशस्त झाला. हिंदुस्तानची फाळणी ही हिंदू समाजाच्या आत्म्यावरची भळभळती जखम आहे. अश्वत्थाम्याच्या माथ्यावरच्या भळभळत्या जखमेसारखी आणि तो घाव घालण्यासाठी कुऱ्हाड चालवली होती ती भारतातल्या कम्युनिस्ट पक्षाने. भारतातला सकल हिंदू समाज कधीही त्यांना माफ करणार नाही.

भारत हे एक सनातन राष्ट्र आहे. या देशाची संस्कृती एक आहे. तिचे नाव हिंदू. या देशाचा हिंदू धर्मवीरांच्या क्षात्रतेजाने ओथंबलेला एक इतिहास आहे. या देशातील हिंदू समाज एक आहे. “भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता-जागता राष्ट्रपुरुष है” ही आमची मातृभूमी आहे आणि आम्ही तिचे सुपुत्र आहोत. “खून दिया है मगर नहीं दी कभी देश की माटी है” ही या देशातील कोट्यावधी हिंदूंच्या अंतरात्म्याची चेतना. “धर्माला अफूची गोळी मानणाऱ्या”  भारतीय कम्युनिस्ट पक्षाला कधी कळलीच नाही. कालही नाही आजही नाही आणि उद्याही कळेल याची सुतराम शक्यता नाही.

स्वातंत्र्यानंतर, विशेषतः १९५० च्या दशकात, पक्षाने घेतलेली हिंदुस्तानच्या फाळणी बाबतची भूमिका भारतीय ऐक्याच्या आणि कामगार वर्गाच्या चळवळीसाठी घातक असल्याचे मान्य केले. मिटक्या मारत शेण खाऊन झाल्यावर चूळा भरण्याचा हा केविलवाणा प्रकार होता. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भारताची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यावर भर देण्यास सुरुवात केली आणि फुटीरतावादी चळवळींना विरोध दर्शवला.अब पछताए होत क्या, जब चिड़िया चुग गई खेत।

रशियन कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच…

१५ ऑगस्ट १९४७ ला देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने “ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है” अशी घोषणा दिली होती. त्यांच्या मते, हे स्वातंत्र्य केवळ सत्तेचे हस्तांतरण होते आणि खरे स्वातंत्र्य अद्याप मिळाले नव्हते. त्यांच्या मते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीगने ब्रिटिश साम्राज्यवादाशी तडजोड करून हे स्वातंत्र्य मिळवले आहे. त्यांच्या मते, यामुळे भारताचे आर्थिक आणि राजकीय शोषण पूर्णपणे थांबले नव्हते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा असा दावा होता की ब्रिटीश गेल्यानंतरही भारतात जुनीच वसाहतवादी नोकरशाही, लष्करी व्यवस्था आणि कायदे सुरू राहिले आहेत आणि ते सर्वसामान्यांच्या हिताचे नाहीत. हे स्वातंत्र्य केवळ भारतीय भांडवलदार आणि जमीनदार वर्गाच्या फायद्याचे होते, तर शेतकरी आणि कामगारांच्या स्थितीत कोणताही मूलभूत बदल झाला नव्हता.

त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभाग घेतला नव्हता. देशाला खंडित का होईना पण १५० वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले यात आनंद मनवायचा सोडून हे स्वातंत्र्य कामगारांच्या संघर्षातून मिळालेले नसल्यामुळे भारतातील हे रशियन राजसत्तेने फेकलेले भाकरीचे तुकडे चघळणारे हे कुत्रे देशाच्या स्वातंत्र्य देवतेवर भुंकत होते.

लातों के भूत बातों से कहां मानते हैं?

१९४८ च्या ‘कलकत्ता काँग्रेस’मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कॉम्रेड बी. टी. रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली “सशस्त्र क्रांती” (Ranadive Line) स्वीकारली होती आणि नेहरू सरकारला “ब्रिटीशांचे हस्तक” संबोधून ते उलथवून टाकण्याचे आवाहन केले होते. यामुळे तेलंगणा आणि इतर भागात हिंसाचार उसळला होता.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुकारलेल्या सशस्त्र क्रांतीच्या आणि हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने २६ मार्च १९४८ रोजी पक्षावर बंदी घातली होती. त्यानंतर मद्रास, हैदराबाद, त्रावणकोर-कोचीन आणि अहमदनगर यांसारख्या इतर काही प्रांतांतही स्थानिक पातळीवर बंदी लादण्यात आली होती.

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ‘हिंसक’ धोरणांवर कडक टीका केली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबले होते. कारण लातों के भूत बातों से कहां मानते हैं?

तुरुंगात या नेत्यांचे पुठ्ठे पक्षाच्या लालबावट्यापेक्षा जास्त लालेलाल झाल्यामुळे १९५१ मध्ये कम्युनिस्ट पक्षाने सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडून संसदीय लोकशाहीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षावरील ठिकठिकाणी बंदी उठवण्यात आली.

रशियन कुत्रे व्होडका ऐवजी चिनी मनचाऊ सूप चाटू लागले…

१९६२ साली चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाच्या वेळी अविभक्त कम्युनिस्ट पक्षातील एका गटाने चीनची बाजू घेतली. त्यांनी या आक्रमणाला ‘क्रांतिकारक युद्ध’ मानले आणि चीनची पाठराखण केली. या युद्धाच्या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना भारतीय सैन्याला रक्तदान न करण्याचे आणि युद्धासाठी निधी गोळा न करण्याचे आदेश दिले होते.

आपल्या कुटुंबाच्या जीवावर उठलेल्या शेजाऱ्याला बाप म्हणण्याची विकृती

या युद्धाच्या काही काळानंतर कम्युनिस्टांनी “चीनचा अध्यक्ष तो आमचा अध्यक्ष” (China’s Chairman is our Chairman) अशा घोषणा दिल्याचे आणि तसे पोस्टर्स लावले होते. आपल्या कुटुंबाच्या जीवावर उठलेल्या शेजाऱ्याला बाप म्हणण्याची ही पराकोटीच्या देशद्रोही विकृती होती.

देशप्रेम हाच गुन्हा ठरवला जातो तेव्हा….

केरळचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड व्ही.एस. अच्युतानंदन हे तेव्हा तिरुवनंतपुरममधील पूजप्पुरा मध्यवर्ती कारागृहात कैदेत होते. कारागृहात असताना त्यांनी कैद्यांना भारतीय जवानांसाठी रक्तदान करण्याचे आणि कारागृहातील रेशन वाचवून जमा झालेला पैसा संरक्षण निधीला देण्याचे आवाहन केले होते. त्यांचा हा प्रस्ताव कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) तत्कालीन अधिकृत धोरणाविरुद्ध मानला गेला. पक्षाने त्यांच्या या कृतीला “अँटी-पार्टी” (पक्षविरोधी) आणि मार्क्सवादी-लेनिनवादी सिद्धांतांच्या विरोधात ठरवले. या “शिस्तभंगासाठी” कॉम्रेड अच्युतानंदन यांना पक्षातून पूर्णपणे काढून टाकण्यात आले नव्हते. परंतु त्यांची पक्षाच्या केंद्रीय समितीमधून हकालपट्टी करून त्यांना कनिष्ठ पातळीवर (ब्राँच कमिटी किंवा जिल्हा सचिवालय) पदावनत (Demote) करण्यात आले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षात कॉम्रेड अच्युतानंदन यांचे देशप्रेम हाच अपराध ठरवला गेला.

लाल वारुळातील नागनाथ आणि भुजंगनाथ वेगळे झाले…

१९६२ च्या चिनी आक्रमणावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षात तीव्र मतभेद झाले. एप्रिल १९६४ मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत ३२ सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षातील फूट उघड झाली. जुलै १९६४ मध्ये आंध्र प्रदेशातील तेनाली येथे डाव्या गटाच्या नेत्यांचे संमेलन भरले. त्यात नवीन पक्षाची पायाभरणी झाली. ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९६४ दरम्यान कोलकाता येथे चिनी आक्रमणाचे स्वागत करणाऱ्या डाव्या गटाने आपली ७वी पक्ष काँग्रेस (अधिवेशन) घेतली. येथेच अधिकृतपणे ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)’ स्थापन करण्यात आला. चिनी आक्रमणाच्या वेळी भारताची बाजू लावून धरणाऱ्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखालील मूळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) डिसेंबर १९६४ मध्ये मुंबईत आपले अधिवेशन घेतले. अशाप्रकारे भारताच्या लाल वारुळातील नागनाथ आणि भुजंगनाथ वेगळे झाले.

त्रिपुरा विधानसभेचा प्रवास… भ*व्यांकडून भगव्याकडे…

त्रिपुरामध्ये १९९३ ते २०१८ या २५ वर्षांच्या काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPIM) सरकार होते. या काळात विधानसभेत कधीही राष्ट्रगीत वाजवले गेले नव्हते.

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-आयपीएफटी (BJP-IPFT) युतीचा विजय झाल्यानंतर १२ व्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सत्ताधारी पक्षाच्या सर्व आमदारांनी विधानसभेत दणक्यात राष्ट्रगीत म्हटले. देशद्रोही आणि कोत्या मनोप्रवृत्तीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदार बादल चौधरी यांनी राष्ट्रगीत म्हणण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांशी चर्चा केली नाही असा आक्षेप घेतला आणि आज हे लाल कुत्रे “संविधान बचाव”चे मोर्चे काढतात. या देशात राष्ट्रगीत म्हणण्यासाठी कोणत्याही भ*व्याशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही. देशद्रोही कम्युनिस्ट भ*व्यांनी भगव्यांकडून तशी अपेक्षा देखील करू नये.

तूच आहेस तुझ्या विनाशाचा शिल्पकार… भारतातील कम्युनिस्ट…

आपल्या देशातील कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास हा फक्त देशद्रोह विश्वासघात गद्दारी मुस्लिम लांगुलचालन आणि हिंदू द्वेषाने भरलेला आहे. आजच्या काळात त्याला भाजप द्वेषाची मोदी द्वेषाची चुरचुरीत फोडणी देण्यात आली आहे.

अमेरिका इस्त्राएलचा निषेध आणि इराणला पाठिंबा हा याच फोडणीचा चुर्रर्र करून आलेला आवाज आहे.

२७ फेब्रुवारी २००२… जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांनी केलेला गोधरा रेल्वे स्टेशनवरील हिंदू नरसंहार ते ७ ऑक्टोबर २०२३… हमासच्या जिहाद्यांनी इस्रायल मध्ये घुसून केलेला यहुदी (ज्यू) नरसंहार यावर अवक्षर न बोलणारे भारतातील कम्युनिस्ट आज इराणला मिठ्या मारत असतील तर, तूच आहेस तुझ्या विनाशाचा शिल्पकार.

या राष्ट्राचा आत्माच न कळल्यामुळे आपल्या देशातील कम्युनिस्टांची काय अवस्था झाली आहे? अक्षरशः ते विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

लल्लनटॉप या युट्युब चॅनेलला मुलाखत देताना JNU चा विद्यार्थी नेता आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा माजी नेता कॉम्रेड कन्हैया कुमार याने १०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे “इस दिल के टुकड़े हजार हुए कोई यहां गिरा कोई वहां गिरा” असे उपहासात्मक वर्णन करून आज ७० तुकडे पडल्याचे सांगितले आहे. जगातील कामगारांना एक करायला निघालेल्या कम्युनिस्टनचे भारतात ७० तुकडे झाले आहेत.

एकेकाळी केरळ पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये सत्ता असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (CPI-M) आज केवळ केरळमध्ये सत्ता राहिलेली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला देशभरातून १.७६% मते मिळाली. त्यांचे लोकसभेत ४ तर राज्यसभेत ४ खासदार आहेत. पुढच्या वेळी ३३ वर्षे एक हाती सत्ता गाजवलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभेतून राज्यसभेवर त्यांचा एकही खासदार निवडून जाणार नाही कारण आज पश्चिम बंगालच्या विधानसभेत त्यांचा एकही आमदार नाही. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला ०.४९% ते मिळाली आणि त्यांचे लोकसभेत २ आणि राज्यसभेत २ खासदार आहेत. आज त्यांची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता निवडणूक आयोगाने काढून घेतली आहे.

भारतातील समस्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष केवळ अस्थिपंजर उरले आहेत…

दास कॅपिटल वाचून आपण आपला सनातनी हिंदू DNA बदलू शकत नाही हे न कळलेल्या या सनातन राष्ट्राचा आत्मा ओळखताना न आलेल्या इथल्या हिंदू संस्कृतीचा सुगंध हुंगता न आलेल्या इथल्या हिंदू समाजाच्या रुढी परंपरांची वीण उसवायला निघालेल्या भारतातील समस्त कम्युनिस्टांसाठी २०२९ची लोकसभा निवडणूक ही भारतातल्या समस्त कम्युनिस्ट पक्षांच्या अस्थिविसर्जनाची निवडणूक ठरणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख