Satara Lok Sabha : सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha) महायुतीतर्फे भाजपाने (BJP) छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी दिली आहे. उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले या देखील आता प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा मतदारसंघात महिलांचे मेळावे सुरु आहेत. कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या मेळाव्यामध्ये बोलत असताना दमयंतीराजे भोसले (Damayantiraje Bhosale) यांनी काँग्रेस (Congress) पक्षावर निशाणा साधला आहे.
उदयनराजे हे काँग्रेस बरोबर असताना काँग्रेसला नेहमी भीती असायची, की उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. हे कुटुंब राजकारणात पुढे आले तर आमचं काय होणार? म्हणूनच काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं, असा आरोप दमयंतीराजे यांनी केला.
उदयनराजेंनी खूप परिश्रम घेतले आहेत, त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. ते पुढे गेले, तर कोणी त्यांना थांबवू शकणार नाही, असं काँग्रेसला वाटायचं, असा दावा दमयंतीराजे यांनी केला. काँग्रेसला त्यांना नेहमी सोबत घेतले पण मागेच ठेवले. आमच्या परिवाराने लोकांसाठीच काम केलं आहे. उदयनराजेंना नेहमीच घरातून शिकवलं गेलं, की तुम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातून असल्यामुळे तुम्हाला आदर, सन्मान मिळाला आहे. तुम्ही लोकांचं देणं लागता, जितकं प्रेम मिळालंय, तितके परत देण्याचा ते प्रयत्न करतात, असंही दमयंतीराजे म्हणाल्या.
हेही वाचा…
माफ करा, आदरणीय उद्धव साहेब; येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल, पुणे येथे अॅडमिशन फॉर्म भरला आहे…
‘मविआच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीस नव्हे तर, या भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला’
‘या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’
‘महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील’