Thursday, October 10, 2024

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट; ग्रामसेवक आता ग्रामविकास अधिकारी

Share

महाराष्ट्र : राज्य सरकारने सरपंचांना आणि ग्रामसेवकांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गूड न्यूज दिली आहे. सोमवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असे करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास विभागाकडून देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याच बैटकीत राज्यातील सरपंचांचे मानधन वाढवण्याच्या निर्णयाला देखील मान्यता देण्यात आली आहे. . राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामविकास विभागातील सहा मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याची महत्त्वाची मागणी या बैठकीत मजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आता 2000 लोकांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधन 3000 रुपयावरुन 6000 रुपये करण्यात येणार आहे, तर उपसरंपचाचे मानधन 1000 वरुन 2000 रुपये करण्यात येणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख