Thursday, October 10, 2024

“अहिल्यानगर नको, अहमदनगर हवं”; शरद पवारांकडे मुस्लिम समाजाची मागणी

Share

अहिल्यानगर : मागील कित्येक वर्षांपासून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी वारंवार केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar) करावे, अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. या सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ झाल्याची घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती. त्यामुळे जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला होता. मात्र आता अहिल्यानगरमध्ये मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना “अहिल्यानगर नको, अहमदनगर हवं”, अश्या घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला.

शरद पवार हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना जामखेड येथील काही मुस्लीम समुदायाकडून त्यांचा सत्कार केला. मात्र यावेळी मुस्लीम बांधवांनी आम्हाला “अहिल्यानगर” नको तर “अहमदनगर”च पाहिजे अशा घोषणा दिल्या. त्यामुळे पुन्हा एकदा नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील मुस्लीम समाजाने “अहिल्यानगर” नावाला विरोध केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी “अहिल्यानगर नको, अहमदनगर हवं”, ही मागणी शरद पवारांकडे का केली असेल? असा प्रश्न सध्या सामान्य जनतेला पडला आहे. मुस्लिमांनी तोडलेल्या हजारो हिंदू देवी देवताच्या मंदिराचे पुनर्निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नको म्हणून शरद पवार तुतारी गट आग्रही आहे?.

अन्य लेख

संबंधित लेख