Wednesday, December 4, 2024

सज्ज व्हा! सजग व्हा! आपण सज्जन आहोत

Share

प्रबोधन मंचातर्फे १४ नोव्हेंबर २०२४ रोजी लेक टाऊन हॉल, बिबेवाडी येथे डॉक्टर संजय उपाध्ये यांचे “भारतीय नागरी कर्तव्य” या विषयावर व्याख्यान आयोजित केले झाले, त्या वेळी ते पुढे म्हणाले मत देणं हे आपलं केवळ कर्तव्य नसून एकत्र येऊन भूमिका मांडणे, समजावून घेणे हे महत्त्वाचं आहे. आज हिंदूंची संख्या कमी होत आहे ही अत्यंत मोठी अडचण आहे. ‘हम दो हमारा एक’ विरुद्ध ‘हम चार और हमारे पचास’ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

लोकसभेत झालेलं एक गठ्ठा मतदान हे याचंच फलस्वरूप होतं, संख्याबळाने काय होऊ शकतं याचा विचार करून आज आपण एकत्र नाही आलो तर भविष्य कठीण आहे असं ते म्हणाले. आज फक्त मत देणं पुरेसं नाही परंतु हिंदू म्हणून भूमिका समजून घेऊन आपण एकत्र राहणे हे आवश्यक आहे. फक्त मतापुरतं नाही तर कायम.

ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे भविष्यात एकत्र कसे राहता येईल, आपल्या जीवनपद्धतीचा भाग कसा करता येईल याचा डोळसपणे विचार करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ एकत्र एक वार ठरवून देवळात जाणे, आरतीला एकत्र येणे इत्यादी. आपणच आपल्या धर्माचे शिक्षण देण्याची, तो निर्भीडपणे पाळण्याची गरज आहे.

आपण सर्व अतिशय सज्जन आहोत. सर्व समावेशक, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला मानणारे आहोत याचा अर्थ असा नव्हे की आपल्याला रागच नाही आला पाहिजे. दोष दिसूनही, चूक दिसूनही गप्प बसणे ही सद्गुण विकृती आहे, ही समूळ नष्ट व्हायला हवी.

आपल्या कुटुंब पद्धतीत निर्माण झालेले दोष काढायला हवेत. कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर एकत्र येणे हे प्रयत्नपूर्वक करायला हवे. हे सर्व बदलायला व्यक्त व्हावे लागेल. ही एकत्र येऊन व्यक्त होण्याची सुवर्णसंधी येत्या २० नोव्हेंबरला आहे. मतदानासाठी मित्र, नातेवाईक, सर्वांना बाहेर काढा आणि भविष्यातही आपण एकत्रच राहू यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले.

शेवटी हर हर महादेव ही घोषणा देऊन सर्व वातावरण भारावून टाकले आणि आपल्या बोलण्याची सांगता त्यांनी केली. त्यानंतर वंदे मातरम म्हणून कार्येक्रम संपला. या कार्यक्रमासाठी १६५ नागरिक उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख