Sunday, October 13, 2024

युरोपियन युनियनचं ए आय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन

Share

युरोपियन युनियननं कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी ए
आय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे. युरोपियन आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धी
पत्रकानुसार, हे एआय कारखाने युरोपियन हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सुपर कॉम्प्युटरच्या
नेटवर्कभोवती तयार केले जातील आणि स्टार्टअप्स, उद्योग आणि संशोधक यांना त्याचा लाभ घेता
येईल. याशिवाय हे ए आय कारखाने युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या ए आय उपक्रमांशी जोडले
जातील आणि यामुळे एक संतुलित ए आय परिसंस्था निर्माण होण्याकरता मदत होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख