Tuesday, September 17, 2024

फडणवीसांना टार्गेट करू नका, मनोज जरांगेंना घरचा आहेर

Share

मनोज जरांगे हे गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणाच्या साठी विविध आंदोलन रस्ता रोको महाराष्ट्रात करण्यात आले आहेत. मराठा समाजाला ओबसीमधून सरसकट आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याखाली मनोज जरांगे वेळोवेळी फक्त देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसत आहेत काही वेळेस म्हणून सरांगे यांच्या तोंडून फडणवीसांविरुद्ध अपशब्दही निघालेले आहेत. अशातच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे की त्यांनी फडणवीसांना टार्गेट करू नये .आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, ”मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करू नये.राज्यात सहा प्रमुख पक्ष आहेत.सहापैकी तीन प्रमुख पक्ष सत्तेत आहेत.तर तीन विरोधात आहेत. विरोधात असलेल्या शरद पवार,उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले यांनी लिहून द्यावं मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी आमची काही हरकत नाही. फडणवीसांन कडून त्या कागदावर सही आणायची जबाबदारी माझी”. असे विधान बार्शीचे अपक्ष असलेले आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे.

आपल्या भाषणात पुढे बोलत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बार्शी मधल्या विकास कामांचा उल्लेख केला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केलेल्या बारा हजार कोटी रुपयांच्या निधीचा राजेंद्र राऊत यांनी उल्लेख केला. आमदार राजेंद्र राऊत यांनी जुलै महिन्यात मराठा आरक्षण आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली होती.
आता हा राजेंद्र राऊत यांच्या विनंतीला जरांगे काय प्रत्युत्तर देतील हे बघण्यासारखे असेल.

अन्य लेख

संबंधित लेख