
उद्या गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबईचा महापौर हिंदूच होणार, तोही मराठीच होणार आणि विकास—या तीनच विषयांभोवती ही निवडणूक फिरते आहे.
हिंदुत्वाचा कैवार घेतलेल्या भारतीय जनता पक्षाचा व पर्यायाने महायुतीचा पराभव करण्यासाठी मुंबईचा मुसलमान मतदार डावपेच आखून मतदान करणार हे उघड आहे. लंडन आणि न्यूयॉर्कच्या पाठोपाठ मुंबईचा महापौर मुसलमान व्हावा यासाठी त्यांची सारी व्यूहरचना आहे. त्यासाठी मुस्लिम समाजाच्या मतांमध्ये फाटाफूट होऊ नये आणि मुस्लीम समाजाचे कोणत्याही पक्षाच्या, जो भाजपप्रणित महायुतीच्या उमेदवाराला हरवू शकतो अशा मुस्लिम उमेदवाराला, वेळ पडली तर काफीर उमेदवारालाही, शतप्रतिशत एकगठ्ठा मतदान व्हावे यासाठी त्यांची सगळी धडपड सुरू आहे.

शतप्रतिशत मतदान करण्यासाठी मुस्लिम मतदारांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता नसते. ती जाण त्यांना उपजतच असते. कोणतीही निवडणूक असो, मुस्लीम मतदार ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान करतो, तेही “अपनेवाला” उमेदवाराला, आणि कटाक्षाने भाजपप्रणित महायुतीला हरवू शकेल अशा उमेदवाराला. मग भले तो काफीर का असेना. वांद्रे (पूर्व) मतदारसंघात मुस्लीम मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पर्यायाने महायुतीच्या “अपनेवाला” झिशान सिद्दीकीला शिवसेना (उबाठा) च्या “काफीर” वरुण सरदेसाईसमोर माती खायला लावली. हे सकल हिंदू समाजाने कधीही विसरता कामा नये.

आता प्रश्न उरतो मुस्लिम मतदारांमध्ये कमीत कमी फाटाफूट होण्याचा. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सगळे मार्ग चोखाळले जात आहेत. उदाहरणार्थ, मुस्लिमांची लक्षणीय लोकसंख्या असलेल्या मालाडच्या मालवणी भागात मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून काँग्रेसने MIM चा तालुकाध्यक्ष फोडून काँग्रेसमध्ये घेतला आहे. तसेच अनेक वॉर्डांमध्ये सक्षम मुसलमान उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवू नये म्हणून सर्वपक्षीय मुस्लिम नेत्यांकडून विविध प्रकारे दबाव आणला गेला. पडद्यामागे अनेक समझोते होऊन अगदी ठरवून बऱ्याच ठिकाणी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांसमोर आपल्याच पक्षाचे कमजोर उमेदवार दिले आहेत. मुल्ला-मौलवींनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अकोल्याच्या खदान मशिदीतील MIM आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांच्या उमेदवारांमधील “ईश्वरचिठ्ठी”चा अभूतपूर्व प्रकार आपल्याला माहिती आहेच.
तरीही मुस्लिम बहुल आणि लक्षणीय मतदारसंघात सत्तेची लालसा आणि आपसातली साठमारी यामुळे अनेक मुसलमान उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे आहेत. याचा फायदा हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहणाऱ्या उमेदवाराला एकगठ्ठा मतदान करून हिंदू मतदारांनी उचलला पाहिजे.

सुदैवाने मुंबईत आजही हिंदू लोकसंख्या ७५ ते ८० टक्क्यांच्या आसपास असल्यामुळे हिंदू समाजाकडे संख्याबळ आहे. परंतु निर्णायक विजयासाठी केवळ संख्याबळ असून उपयोग नसतो. त्यासाठी योग्य ती राजकीय व्यूहरचना करावी लागते.
हिंदू महापौर होण्यासाठी हिंदू मतदारांना “हिंदू व्होट बँक” आणि शतप्रतिशत मतदान अशी अचूक व्यूहरचना करावी लागेल.

१७ डिसेंबर १९०३ रोजी अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी ५९ सेकंद विमान उडवण्याचा पहिला प्रयोग केला. मानवी जीवनातली ही पहिल्यांदा हवेत उडण्याची अभूतपूर्व क्रांती होती. यातूनच पुढे पंख्यांची (propeller) विमाने विकसित झाली. मात्र वेग, पल्ला आणि प्रवासी क्षमता याबाबतीत या विमानांना खूपच मर्यादा होत्या. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी इंधन भरण्यासाठी या विमानांना बरेच थांबे घ्यावे लागत असत आणि कमी वेगामुळे प्रवासालाही खूप वेळ लागत असे.

पुढे १९३७ साली जेट इंजिनाचा शोध लागला आणि विमान क्षेत्रात विलक्षण क्रांती झाली. विमानाचा वेग, पल्ला आणि प्रवासी क्षमता यामध्ये प्रचंड वाढ झाली. आवाजापेक्षा जास्त गतीने प्रवास करणारे कॉनकॉर्ड विमान तयार झाले. जेट इंजिनची विमाने कुठेही इंधन न भरता एका खंडातून दुसऱ्या खंडात, अगदी पॅसिफिक महासागरही एका दमात पार करू लागली. पंख्यांच्या इंजिनापेक्षा प्रचंड वाढलेल्या वेगामुळे प्रवासाला लागणारा वेळही मोठ्या प्रमाणावर कमी झाला.
म्हणजे माणसाने पंख्यांच्या विमानाने आकाशात उडणे ही मानवी जीवनातील अभूतपूर्व क्रांती असेल, तर जेट इंजिनाचा शोध ही त्या क्रांतीअंतर्गत आणखी एक अभूतपूर्व क्रांती होती.

त्याचप्रमाणे भारताच्या संसदीय लोकशाहीत “जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा” या घोषणाभोवती एकवटलेली “हिंदू व्होट बँक” उभी राहणे ही माणसाने पहिल्यांदा हवेत उडण्यासारखी, पंख्यांच्या विमानासारखी अभूतपूर्व क्रांती होती. आज देशातील साधारण ३७ टक्के मतदार हिंदुत्वाच्या बाजूने मतदान करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या “सांस्कृतिक राष्ट्रवाद”, अर्थात हिंदुत्वाला याचे श्रेय जाते. निश्चितच ही एक अभूतपूर्व क्रांती आहे.
पण मुळातच हिंदू समाज जर ५० ते ५५ टक्के मतदान करत असेल, तर त्यातील हिंदुत्वासाठी मतदान करणारा अंदाजे ३७ टक्के मतदार अजूनही हवा तितका प्रभावी ठरत नाही. त्यातही लोकसभा आणि विधानसभेला बेताच्या उत्साहाने मतदान करणारा हिंदू मतदार महापालिकेला मात्र भलतेच औदासीन्य दाखवतो. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत जेमतेम ५५.५० टक्के मतदान झाले होते.
यावर रामबाण उपाय म्हणजे “राष्ट्र सर्वोपरी” मानून हिंदुत्वाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना मतदान करणारी “हिंदू व्होट बँक” ही संकल्पना समाजाच्या तळागाळापर्यंत केवळ मजबूत करून न ठेवता ती वाढवत नेणे आणि हिंदू समाजाचे शतप्रतिशत मतदान घडवून आणणे. विमान क्षेत्रातील जेट इंजिनाच्या क्रांतीसारखी ही भरारी घेणारी क्रांती ठरेल. एकदा का सकल हिंदू मतदार मतदान केंद्रावर पोहोचू लागला की जात, पात, भाषा, प्रांत, धर्म यावर उभ्या राहिलेल्या या देशातील सगळ्या प्रकारच्या मतपेढ्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडतील.
व्यावहारिक दृष्ट्या हे शक्य आहे का? हो, शक्य आहे.

जेमतेम ६० लाख लोकसंख्या असलेल्या भारताच्या ईशान्येतील छोट्याशा त्रिपुरा राज्यात कम्युनिस्टांच्या ३५ वर्षांच्या एकछत्री, जुलमी आणि दडपशाहीच्या अंमलात त्रिपुराच्या जनतेत प्रचंड राजकीय जागृती आली. कम्युनिस्टांच्या राजवटीत कोणतीही निवडणूक असो, त्रिपुरामध्ये मतदानाची टक्केवारी कधीही ९० च्या खाली नसायची. बंगाली भाषिक बंधू-भगिनी असोत की जनजातीय बंधू-भगिनी, सर्वच मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान करत. एखाद्या मतदान केंद्रावर दुपारपर्यंत मतदान ९० टक्क्यांपेक्षा कमी झाले असेल, तर कम्युनिस्ट उमेदवार स्वतः धावत यायचा आणि त्या मतदान केंद्रावरील आपल्या कार्यकर्त्यांची झाडाझडती घ्यायचा. मतदान क्षेत्राबाहेर गेलेले आणि अंथरुणाला खिळलेले मतदार वगळता बाकी सगळ्या मतदारांना कम्युनिस्ट कार्यकर्ते मतदान करायला लावायचे. जे त्रिपुरात होऊ शकते, ते आपल्याकडे का नाही?
आज एवढीच कार्यक्षमता हिंदुत्वासाठी अहोरात्र झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे.
मुंबईकरांनो, आपला महापौर हिंदू करायचा आहे आणि त्याच्यासाठी उद्या — आधी बोटाला काळी शाई,
नंतरच नाश्ता आणि चहापाणी.
कारण,
“चिर विजय की कामना ही राष्ट्र का आधार है ” l
– मालवणी खवट्या