Saturday, November 23, 2024

धर्म आणि राजकारण 

Share

देशाची लाेकसंख्या १४५ काेटींवर पाेहाेचली आहे. या लाेकसंख्यावाढीत मुस्लिमांचा टक्का प्रचंड असल्याने गठ्ठा मतदानाचा टक्काही आपाेआपच वाढला आहे. देशाचे तुकडे करण्याची मनीषा बाळगणारे देशद्राेही भारतात सक्रिय आहेत. अशा लाेकांना काँग्रेस पक्षाने सदैव केवळ मतांच्या लाचारीसाठी खतपाणी घातले आहे. हिंदू जागृत हाेऊ लागल्याने केवळ मुस्लिमांच्या मतांवर निवडणुका जिंकणे शक्य नसल्याचे या लाेकांच्या ध्यानात आले आहे. त्यामुळेच काँग्रेससह शरद पवारांनीही आपल्या रणनीतीत बदल केला आहे. हिंदू आणि हिंदुत्व वेगळे असल्याचे हे लाेक सांगू लागले आहेत. परंतु, मतांच्या लाचारीसाठी देशहिताशी तडजाेड करणाऱ्यांना हिंदुत्वावर बाेलण्याचा अधिकार आहे का? हिंदू आजही एकसंध नाही आणि नेमकी हीच बाब काँग्रेस-राकाँच्या पथ्यावर पडत आहे. 

शिवाजी महाराजांना जाणता राजा संबाेधण्यात शरद पवारांना अडचण आहे. कारण, ही पदवी रामदास स्वामींनी दिल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे. रामदास स्वामी ब्राह्मण नसते तर ही पदवी पवारांना मान्य हाेती का? ब्राह्मण समाजाला विराेध करून असंतुष्टांची मते खेचण्याच्या अशा घाणेरड्या राजकारणातून शिवाजी महाराजांचा अपमान हाेत नाही का? शरद पवार स्वत:ला शिवाजी महाराजांपेक्षा श्रेष्ठ समजतात का? चेलेचेपाट्यांनी पवारांना ‘जाणता राजा’ ही बदवी बहाल केली आहे. पवार चेलेचेपाट्यांच्या मतांशी सहमत आहे का? असेल तर मग शिवरायांची महानता नाकारून स्वत:ला जाणता राजा घाेषित का करीत नाही? तुम्ही हजार वेळा जन्मा घ्या अथवा लाखाे शरद पवार पैदा करा पण तुम्हाला शिवाजी महाराजांच्या तळपायाची तरी बराेबरी करता येईल का?  

शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विराेधातच नव्हते; असाही नॅरेटिव्ह अलिकडे या लाेकांकडून पसरविला जात आहे. मग शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना का करावी लागली, हे एकदा या लाेकांनी देशाला समजावून सांगितले पाहिजे. भविष्यात कदाचित हे लाेक शिवाजी महाराज हिंदूच नव्हते, असेही सांगतील! शिवरायांच्या सैन्यात माेठ्या संख्येने मुस्लिमांचा भरणा हाेता, असा युक्तिवाद करून इतिहास नासवण्याचे पातक केवळ सत्तेच्या हव्यासापाेटी केले जात आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात काही मुस्लिम हाेते, ही बाब काेणीही नाकारत नाही. देशप्रेमी मुस्लिमांबद्दल आजही हिंदूंची तक्रार नाही. मुस्लिम डाॅ. अब्दुल कलामांच्या विचारांवर चालणारा असावा, आतंकवादी विचारसरणीचा नाही, अशी अपेक्षा केली तर बिघडले कुठे? हिंदू सहिष्णू आहे हे खरे असले तरी काेणी आपल्या सार्वभाैमत्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे सर्व मुकापटणे सहन करण्यासाठी हिंदू षंढसुद्धा नाही! त्याला आपला देश आणि धर्माचे रक्षण कसे करावे, हे चांगलेचे अवगत आहे. 

अलिकडे मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदाेलने करून सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. जरांगे यांनी खरे तर यासाठी शरद पवारांनाच जाब विचारला पाहिजे. परंतु, केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे. पवारांचा मनोज जरांगे यांना छुपा पाठिंबा आहे. (नव्हे, मनोज जरांगे हे शरद पवारांचेच पिलू आहे! असे एकूणच वाटावे अशीच परिस्थिती आहे.) शरद पवार स्वत: चारवेळा मुख्यमंत्री राहिले. तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण का देऊन टाकले नाही? सत्तेत असताना पवारांनी नेहमी मराठा आरक्षणाविराेधात भूमिका घेतली. मात्र, आता त्यांचेच लाेक या विषयावरून राळ उठवत आहे. 

लेबनाॅनमध्ये सुरू असलेल्या युद्धात इस्रायलने आतंकवाद्यांचा खात्मा सुरू केला आहे. हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाह मारला गेल्याने भारतातील देशद्राेह्यांनी ऊर बडवून घेतले. नसरल्लाह हा एक आतंकवादी हाेता आणि त्याने शेकडाे निष्पाप ज्यू लाेकांची हत्या केली. त्यामुळे एका आतंकवाद्यासाठी अश्रू ढाळणाऱ्यांवर देशद्राेहाचा खटला भरून तिकडे लेबनाॅनमध्येच हाकलून दिले पाहिजे. बांगलादेशात अल्पसंख्यक हिंदूंवर अताेनात अन्याय-अत्याचार सुरू आहे. परंतु, भारतात पुराेगामित्वाचे दुकान चालवणाऱ्यांना बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय-अत्याचार दिसत नाही. एखाद्या मुस्लिमावर अन्याय झाला तर मात्र हे लाेक रस्त्यावर उतरतात. हा शुद्ध ढाेंगीपणा आहे. 

काेल्हापुरात राहुल गांधी यांनी शिवपुतळ्याचे अनावरण केले. परंतु, काँग्रेस नेत्यांनी अनेकदा मुस्लिमांना खूश करण्यासाठी औरंगजेबाची स्तुती केली आहे. प्रसंगी स्वराज्यावर चालून आलेल्या या अत्याचारी औरंगजेबाला संत ठरवण्याचे पातक याच लाेकांनी करून पाहिले. दिग्विजय सिंग नावाच्या वाचाळविराने तर आतंकवाद्यांचेही गाेडवे गायिले. अशा परिस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करून राहुल गांधींना नेमके काय सिद्ध करायचे आहे? काँग्रेस आजपर्यंत हिंदू समाजाला मूर्ख समजत आली आहे. त्यामुळेच या पक्षाने सातत्याने मुस्लिमांचे लांगुलचालन केले. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, प्रचार करताना हिंदू आणि हिंदुत्वावर टीका करून विनाकारण जनतेच्या संयमाची परीक्षा पाहू नका….

पुंडलिक आंबटकर
नागपूर

अन्य लेख

संबंधित लेख